Navratri -अंबाबाई कनकधारा लक्ष्मी रुपात, रविवारी अष्टमीची नगरप्रदक्षिणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 16:10 IST2019-10-05T16:08:39+5:302019-10-05T16:10:27+5:30
शारदीय नवरात्रौत्सवाच्या सातव्या माळेला (शनिवार) कोल्हापुरच्या श्री अंबाबाईची कनकधारा लक्ष्मी रुपात पूजा बांधण्यात आली. रविवारी अष्टमी असल्याने रात्री साडे नऊ वाजता अंबाबाईची उत्सवमूर्ती फुलांनी सजलेल्या वाहनात बसून नगरवासियांच्या भेटीसाठी नगरप्रदक्षिणेला जाईल.

शारदीय नवरात्रौत्सवाच्या सातव्या माळेला (शनिवार) कोल्हापुरच्या श्री अंबाबाईची कनकधारा लक्ष्मी रुपात पूजा बांधण्यात आली. ही पूजा मंदार मुनिश्वर, आशुतोष ठाणेकर, केदार मुनिश्वर यांनी बांधली. (छाया : आदित्य वेल्हाळ)
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या सातव्या माळेला (शनिवार) कोल्हापुरच्या श्री अंबाबाईची कनकधारा लक्ष्मी रुपात पूजा बांधण्यात आली. रविवारी अष्टमी असल्याने रात्री साडे नऊ वाजता अंबाबाईची उत्सवमूर्ती फुलांनी सजलेल्या वाहनात बसून नगरवासियांच्या भेटीसाठी नगरप्रदक्षिणेला जाईल.
अंबाबाईच्या नित्य धार्मिक विधींप्रमाणे शनिवारी सकाळी अभिषेक व दुपारची महाआरती झाल्यानंतर अंबाबाईची आदि शंकराचार्यांनी वर्णन केलेल्या कनकधारा महालक्ष्मी रुपात पूजा बांधण्यात आली.
ही पूजा मंदार मुनिश्वर, आशुतोष ठाणेकर, केदार मुनिश्वर यांनी बांधली. रविवारी रोजच्या पालखीऐवजी अंबाबाई सजलेल्या वाहनात बसून कोल्हापूरवासियांच्या भेटीला निघते. साडे नऊ वाजता तोफेच्या सलामीनंतर या नगरप्रदक्षिणेला सुरूवात होईल. रात्री बारानंतर देवीची उत्सवमूर्ती पून्हा मंदिरात आल्यानंतर महाकाली मंदिरासमोर जागराचा होम सुरू होईल.