कोगनोळीतील अंबाबाईचा जागर सोहळा उत्साहात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 07:06 PM2020-10-24T19:06:29+5:302020-10-24T19:07:43+5:30

navratri, kognoli, ambabaitemple, kolhapurnews कोगनोळी आणि पंचक्रोशीतील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री अंबाबाई देवीच्या घटस्थापनेपासून सुरू झालेल्या नवरात्रोत्सवाचा शेवट आज जागर सोहळ्याने संपन्न झाला.

Ambabai's awakening ceremony in Kognoli in excitement | कोगनोळीतील अंबाबाईचा जागर सोहळा उत्साहात 

कोगनोळीतील अंबाबाईचा जागर सोहळा उत्साहात 

googlenewsNext
ठळक मुद्देकोगनोळीतील अंबाबाईचा जागर सोहळा उत्साहात पंचक्रोशीतील भाविकांनी केली दर्शनासाठी गर्दी

बाबासो हळिज्वाळे

कोगनोळी : कोगनोळी आणि पंचक्रोशीतील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री अंबाबाई देवीच्या घटस्थापनेपासून सुरू झालेल्या नवरात्रोत्सवाचा शेवट आज जागर सोहळ्याने संपन्न झाला.

सकाळी नऊ वाजता मान्यवरांच्या हस्ते देवीची आरती झाली. त्यानंतर देवीच्या पालखीसह, बिरदेवाची पालखी व अश्व यांच्या ग्राम प्रदक्षिणेस सुरुवात झाली. ही प्रदक्षिणा छत्रपती शिवाजी महाराज चौक, महादेव गल्ली, लोखंडे गल्ली, पी ॲन्ड पी सर्कल, मगदूम गल्ली, माळी गल्लीतून गावातील प्रमुख मार्गांवरून मंदिरा पर्यंत पोहोचली. मंदिरा जवळ येताच आश्वासह पालख्या, मानकरी यांनी धावत जाऊन मंदिर प्रदक्षिणा पूर्ण केली. यावेळी भाविकांनी खोबऱ्याची उधळण केली.

यावेळी माजी उर्जा मंत्री वीरकुमार पाटील, तालूका पंचायत सदस्य प्रितम पाटील, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, माजी मंडल पंचायत अध्यक्ष शरद पाटील(काका), योगेश पाटील, अतुल कुलकर्णी, सी के पाटील, अनिल चौगुले, आप्पाासाहेब मगदूम, अशोक मगदूम, प्रकाश गायकवाड यांच्याबरोबरच सनदी मानकऱ्यांसह अनेक भाविक उपस्थित होते.

यावेळी देवीच्या‍ जागर सोहळयास मुंबई, पुणे, कोल्हापूर, निपाणी, संकेश्वर, सांगली, सातारा, बेळगाव, चिक्कोडी सह पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

Web Title: Ambabai's awakening ceremony in Kognoli in excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.