Ambabai Kirnotsav Sohala 2023: दुसऱ्या दिवशीही धुक्यांनी अडवली किरणांची वाट
By इंदुमती सूर्यवंशी | Updated: November 10, 2023 19:25 IST2023-11-10T19:25:06+5:302023-11-10T19:25:30+5:30
कोल्हापूर : अंबाबाईच्या किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ढगांनी मावळतीच्या सूर्यकिरणांची वाट अडवली. गुरुवारी सर्यकिरणे किमान पितळी उंबऱ्यापर्यंत आली होती, पण ...

Ambabai Kirnotsav Sohala 2023: दुसऱ्या दिवशीही धुक्यांनी अडवली किरणांची वाट
कोल्हापूर: अंबाबाईच्या किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ढगांनी मावळतीच्या सूर्यकिरणांची वाट अडवली. गुरुवारी सर्यकिरणे किमान पितळी उंबऱ्यापर्यंत आली होती, पण शुक्रवारी ते देखील घडले नाही. किरणे मंदिर आवारात आलीच नाहीत.
त्यामुळे भाविकांच्या दर्शन रांगा सुरूच ठेवण्यात आल्या. दक्षिणायन किरणोत्सवास बुधवारी(दि.८) पासून सुरुवात झाली आहे. आता किरणोत्सवाचे उद्या शनिवार आणि रविवार (दि.१२) असे दोन दिवस आहेत. मात्र असेच वातावरण राहिले तर किरणोत्सव होण्याची शक्यता धूसर आहे.
काल पितळी उंबरठ्यापर्यंत पोहचली होती किरणे
काल, गुरुवारी सुर्यकिरणे देवीच्या पितळी उंबरठ्यापर्यंत पोहचून लुप्त झाली होती. किरणे देवीच्या मूर्तीपर्यंत पोहचण्यात ढगांचा अडथळा ठरला होता. परिणाम किरणे देवीच्या गाभारापर्यंत पोहचलीच नाही.