कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अमल महाडिक यांनी भरला अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 15:11 IST2019-10-01T15:09:29+5:302019-10-01T15:11:39+5:30
कोल्हापूर : कोल्हापुरातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थित आमदार अमल महाडिक यांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघासाठीचा उमेदवारी अर्ज भरला. पालकमंत्री चंद्रकांत ...

कोल्हापुरात मंगळवारी भाजपचे उमेदवार आमदार अमल महाडिक यांनी ‘कोल्हापूर दक्षिण’ मतदारसंघातील अर्ज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांच्याकडे सादर केला. यावेळी डावीकडून महेश जाधव, धनंजय महाडिक, बाबा देसाई उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)
कोल्हापूर : कोल्हापुरातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थित आमदार अमल महाडिक यांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघासाठीचा उमेदवारी अर्ज भरला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार धनंजय महाडिक, आमदार सुरेश हाळवणकर, संघटनमंत्री बाबा देसाई, महानगरजिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, ताराराणी आघाडीचे स्वरुप महाडिक, नगरसेवक सत्यजित कदम, आदी प्रमुख उपस्थित होते.
करवीरनिवासिनी अंबाबाईचे दर्शन घेवून बिंदू चौकातील भाजप कार्यालयात सकाळी सव्वा दहा वाजता आल्यानंतर बिंदू चौकापर्यंत चालत येवून तेथून वाहनात बसून सर्वजण जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्यांच्याबरोबर भाजपच्या टोप्या, स्कार्फ घातलेले कार्यकर्ते दुचाकी, चारचाकी वाहनांतून कार्यकर्ते आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर महिला-पुरुष कार्यकर्ते थांबून होते. पालकमंत्री पाटील, प्रदेश उपाध्यक्ष महाडिक, संघटनमंत्री देसाई, आदींच्या उपस्थितीत आमदार महाडिक यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांच्याकडे सादर केला.
यावेळी ‘गोकुळ’चे अध्यक्ष रविंद्र आपटे, नगरसेवक ईश्वर परमार, शेखर कुसाळे, अशोक देसाई, नगरसेविका उमा इंगळे, भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य प्रताप कोंडेकर, आदी उपस्थित होते. त्यानंतर पालकमंत्री पाटील पुढील दौऱ्यासाठी रवाना झाले.
थोड्यावेळाने आमदार हाळवणकर यांच्या उपस्थितीत आमदार महाडिक यांचा दुसरा आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांचाही अर्ज भरण्यात आला. अर्ज भरून आलेल्या आमदार महाडिक यांचे भाजप, महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ढोल-ताशांचा गजर आणि विजयाच्या घोषणा देत शुभेच्छा दिल्या.