चिंता सोडून वर्तमानकाळात नेहमी आनंदात जगा

By Admin | Updated: March 22, 2016 00:19 IST2016-03-22T00:12:37+5:302016-03-22T00:19:23+5:30

श्वेता जुमानी : टॉक शोमध्ये सखींशी मनमुराद संवाद; अमित असळकर, दुर्गा भिंगार्डे यांच्या आरोग्यविषयक मार्गदर्शनाचा लाभ

Always worry about leaving the worries in the present day | चिंता सोडून वर्तमानकाळात नेहमी आनंदात जगा

चिंता सोडून वर्तमानकाळात नेहमी आनंदात जगा

\कोल्हापूर : प्रत्येकजण माझे भविष्य कसे असेल, हा विचार करत वर्तमानकाळ वाया घालवितो आणि भूतकाळात केलेल्या चुकांचा विचार करून वर्तमानकाळात दु:खी राहतो. भूतकाळ बदलू शकत नाही आणि भविष्यकाळ तुमच्या हातामध्ये नाही. फक्त वर्तमानकाळ हाच तुमच्या हातात आहे. त्यामुळे भूतकाळ व भविष्यकाळातील चिंता सोडून वर्तमानकाळात आनंदात जगा, असा मोलाचा सल्ला प्रख्यात अंकशास्त्रज्ञ श्वेता जुमानी यांनी दिला.
राजाराम महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात सोमवारी ‘लोकमत’ सखी मंचच्या सदस्यांसाठी आयोजित ‘टॉक शो विथ श्वेता जुमानी’ कार्यक्रमात त्यांनी सखींशी मनमुराद गप्पा मारल्या. या कार्यक्रमाचे इम्पलाडेंट व हार्मोकेअर हे प्रायोजक होते.
दीपप्रज्वलन करून व ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन श्वेता जुमानी यांच्यासह त्यांच्या आई बिंदू जुमानी, डॉ. दुर्गा भिंगार्डे यांच्या हस्ते करण्यात आले.
श्वेता जुमानी म्हणाल्या, मी आजपर्यंत केवळ चित्रपटसृष्टीतल्याच नव्हे, तर उद्योग, व्यापार, अर्थकारण अशा इतरही अनेक क्षेत्रांतल्या मंडळींना मार्गदर्शन केले आहे. प्रत्येक व्यक्तीची जशी रास असते, तसा भाग्यांकही असतो. या भाग्यांकाची त्यांना मदत होऊ शकते. लहानपणापासून आयुष्याच्या शेवटपर्यंत आपल्यासोबत एक अंक असतो. शाळेत असताना पाढे, घरचा पत्ता, गाडीचा नंबर, फोन नंबर, बँकेचा नंबर या सर्व गोष्टींमुळे अंक आपल्या सोबत असतात. हेच अंक आपले जीवन सुखी व आनंदी करण्यासाठी मदत करत असतात, असे त्यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या, जीवनात सुख-शांती, प्रगती कोणाला नको असते? अनेकांकडे पैसा आहे, पण शांती नाही. खूप कष्ट करूनसुद्धा प्रगती होत नाही. क्षमता असूनसुद्धा त्यांना मनासारखी प्रगती होत नाही. मात्र, काही लोक काही न करता त्यांच्याकडे पैसा येत असतो. त्यावर अंकशास्त्र हा एक चांगला उपाय आहे.
आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाला सर्व गोष्टी पटकन पाहिजे असतात. अंकशास्त्र हे असे शास्त्र आहे, जे विना जन्मपत्रिका काम करते. यासाठी फक्त जन्मदिनांक खूप महत्त्वाचा ठरतो. अंकशास्त्र अर्थात न्यूमरॉलॉजीचा मी लहानपणापासूनच अभ्यास करण्यास सुरुवात केली. यासाठी माझ्या वडिलांची मला खूप मदत मिळाली. आपली सही
कशी असावी, नावाचे स्पेलिंग कसे असावे, जन्मांक, भाग्यांकाचे महत्त्व काय, या विषयावर श्वेता जुमानी
यांनी सखींशी संवाद साधल्या. तसेच १ ते ९ अंक, जन्मतारखा कशा व
त्यांचे लकी क्रमांक यांची माहिती दिली.
दरम्यान, हार्मोकेअरचे डॉ. अमित असळकर यांनी थॉयरॉईडविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच इम्पलाडेंटच्या डॉ. दुर्गा भिंगार्डे यांनी चेहऱ्याचे सौंदर्य व दातांचे महत्त्व याविषयी उपस्थित सखींना मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात सखी सदस्या उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)


‘लोकमत’मुळे माझी ओळख
मला जी काही प्रसिद्धी मिळाली आहे, ती फक्त ‘लोकमत’मुळेच मिळाली आहे. कारण मी अंकशास्त्राविषयी प्रथम ‘लोकमत’मधून लिहिण्यास सुरुवात केली. त्यामुळे माझी ओळख सर्वदूर झाली. माझ्या यशात ‘लोकमत’चे पाठबळ मोठे आहे, असे श्वेता जुमानी यांनी आवर्जून सांगितले.


शेवटचे सात दिवस
‘लोकमत’ सखी मंच सदस्य नोंदणी सुरू असून, नोंदणासाठी शेवटचे सात दिवस शिल्लक आहेत. तरी इच्छुक महिलांनी लोकमत शहर कार्यालय व सखी मंच कमिटी मेंबर यांच्याकडे संपर्क साधावा.


सखींंना दिलेल्या टिप्स्
काळा व लाल रंग वापरू नये.
२४ अंक हा शुभ असतो.
निळा रंग अत्यंत शुभ असतो.
मेहनत करीत रहा.

Web Title: Always worry about leaving the worries in the present day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.