शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
5
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
6
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
7
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
8
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
9
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
11
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
12
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
13
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
14
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
15
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
16
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
17
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
18
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
19
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
20
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
Daily Top 2Weekly Top 5

युती सरकार, एकदम बेकार...

By admin | Updated: July 23, 2015 00:48 IST

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा विविध मागण्यांसाठी आंदोलन

कोल्हापूर : ‘युती सरकार, एकदम बेकार’, ‘शिक्षणमंत्री हाय हाय’, ‘आमच्या मागण्या मान्य करा’, अशा घोषणा देत विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी संगीता चौगुले यांना निवेदन दिले.संचमान्यतेच्या आॅनलाईन संगणक प्रणालीतील दोष दूर न केल्याच्या निषेधार्थ, तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण महासंघाच्या आदेशानुसार हा मोर्चा काढण्यात आला. यासाठी दुपारी तीन वाजता शिक्षक टाऊन हॉल येथे जमले. तेथून दसरा चौक, लक्ष्मीपुरी, कोंडा ओळ, उद्योग भवन मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आला. मोर्चात आंदोलनकर्ते शिक्षक राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आला. प्रवेशद्वारावर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रोखले. याठिकाणी आंदोलनकर्त्यांनी ‘युती सरकार, एकदम बेकार’, ‘शिक्षणमंत्री हाय हाय’, अशा जोरदार घोषणा दिल्या. त्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी चौगुले यांना देऊन शिक्षकांच्या भावना सरकार, शासनाला कळविण्याची विनंती केली. आंदोलनात संघाचे अध्यक्ष एस. बी. उमाटे, सचिव अविनाश तळेकर, उपाध्यक्ष ए. डी. चौगुले, सी. व्ही. जाधव, आर. एफ. देवरमणी, पी. डी. पाटील, एम. के. परीट, पी. के. पाटील, आर. पी. टोपले, बी. बी. घव्हाळे, बी. एस. पाटील, अशोक पाटील, आदींसह शिक्षक सहभागी झाले होते. प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी सरकारला २० आॅगस्टपर्यंत मुदत दिली होती. परंतु, याबाबतचा निर्णय घेतला नसल्याने महासंघाने आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार बुधवारी मोर्चा काढण्यात आला. राज्यातील सर्व शिक्षक उद्या, शुक्रवारपासून काळ्या फिती लावून काम करतील. त्यानंतर २७ जुलैला मुंबईत जेल भरो आंदोलन आणि १ आॅगस्टला राज्यातील सर्व तहसील कार्यालयांसमोर उपोषण करण्यात येईल.- प्रा. ए. एस. तळेकर, सचिव, कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघ.