पंचगंगेसह सर्वच नद्या पात्राबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 12:01 AM2019-09-06T00:01:25+5:302019-09-06T00:01:28+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात रिपरिप असली तरी डोंगरी तालुक्यासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस बरसत आहे. गगनबावड्यात अतिवृष्टी झाली ...

All the rivers including Punchgang are out of the water | पंचगंगेसह सर्वच नद्या पात्राबाहेर

पंचगंगेसह सर्वच नद्या पात्राबाहेर

Next

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात रिपरिप असली तरी डोंगरी तालुक्यासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस बरसत आहे. गगनबावड्यात अतिवृष्टी झाली असून राधानगरी धरणाचे पाच दरवाजे खुले झाले आहेत. त्यातून ८५४० क्युसेक विसर्ग सुरू आहे. विसर्ग वाढल्याने पंचगंगेसह सर्वच नद्या पात्राबाहेरून वाहत आहेत.
गेल्या महिन्याभरात तिसऱ्यांदा पात्राबाहेर पडलेल्या पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत एका दिवसात तब्बल आठ फुटांनी वाढ झाली आहे. ४२ बंधारे पाण्याखाली गेले असून दोन राज्यमार्ग आणि पाच जिल्हा मार्ग वाहतुकीस बंद झाले आहेत. नृसिंहवाडीतील दत्तमंदिरात पुन्हा पाणी आले आहे.
बुधवारी (दि. ४) सायंकाळी पंचगंगा नदीची राजाराम बंधाºयाजवळील पाणीपातळी २२ फुटांवर होती. ती गुरुवारी सायंकाळपर्यंत ३० फुटांवर पोहोचली आहे. चंदगड- तिलारी आणि करवीर शिंगणापूर-तिटवे हा राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे; तर बंधाºयावर पाणी आल्याने पाच जिल्हा मार्गांवरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे.
पाटण, कºहाडमध्ये पुन्हा पूरस्थिती
सातारा जिल्ह्यात गुरुवारी (दि. ५ सप्टेंबर) पहाटे आणि बुधवारी दिवसभरात एकूण ३३२.९१ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. कोयना धरण परिसरात जोरदार पाऊस सुरू असून, धरणात १०३.६४ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. ५० हजार ३४२ क्युसेक पाण्याची आवक होत असून, धरणातून ७० हजार ४०४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू
आहे.

Web Title: All the rivers including Punchgang are out of the water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.