शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

मेरी हर साँस देश के नाम पर मिट जाँए...; शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय कव्वाली स्पर्धेचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 10:53 AM

: ‘चाह ये है के मेरी हर साँस देश के नाम पर मिट जाँए’, ‘आज गहेरी नींद मे चला है फिर तेरा वतन’, अशा कव्वालीतून शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांनी सोमवारी देशभक्तीचा जागर केला. भारतीय विद्यापीठ महासंघ (एआययू) आणि शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित ‘जश्न-ए-कव्वाली’ या तिसऱ्या राष्ट्रीय आंतर-विद्यापीठ कव्वाली स्पर्धेस उत्साहात प्रारंभ झाला.

ठळक मुद्देमेरी हर साँस देश के नाम पर मिट जाँए...देशभक्तीचा जागरशिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय कव्वाली स्पर्धेचा प्रारंभ

कोल्हापूर : ‘चाह ये है के मेरी हर साँस देश के नाम पर मिट जाँए’, ‘आज गहेरी नींद मे चला है फिर तेरा वतन’, अशा कव्वालीतून शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांनी सोमवारी देशभक्तीचा जागर केला. भारतीय विद्यापीठ महासंघ (एआययू) आणि शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित ‘जश्न-ए-कव्वाली’ या तिसऱ्या राष्ट्रीय आंतर-विद्यापीठ कव्वाली स्पर्धेस उत्साहात प्रारंभ झाला.विद्यापीठातील वि. स. खांडेकर सभागृहामध्ये या स्पर्धेचे उद्घाटन ‘एआययू’चे सहसचिव डॉ. डेव्हीड सॅम्पसन यांच्या हस्ते झाले. यावेळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, ‘एआययू’चे निरीक्षक डॉ. विश्वरामन निर्मल प्रमुख उपस्थित होते.

या ‘जश्न-ए-कव्वाली’ची सुरुवात सागर (मध्य प्रदेश) मधील डॉ. हरिसिंह गौर विद्यापीठाच्या संघाने केली. या संघाने ‘मेहफिल हमारी एक है, मेहफिल के टुकडे मत करो... मंजिल हमारी एक है, मंजिल के टुकडे मत करो... भारत हमारा एक है, भारत के टुकडे मत करो...’ या कव्वालीतून एकात्मतेची साद घातली.

राजस्थानच्या बनस्थळी विद्यापीठाच्या संघाने ‘चाह ये है के मेरी हर साँस देश के नाम पर मिट जाए’ ही कव्वाली सादर केली. शिवाजी विद्यापीठाच्या संघाने ‘आज गहेरी नींद मे चला है फिर तेरा वतन’ आणि ‘मन कुंथो मौला...’ ही कव्वाली सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

मुंबई विद्यापीठाच्यासंघाने सादर केलेल्या ‘ये वतन तेरे खातीर...’ ‘आज रंग है री...’ या कव्वालीने स्पर्धेत रंग भरला. पंजाबच्या लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या सादरीकरणाने स्पर्धेच्या पहिल्या दिवसाचा समारोप झाला. उर्दूतील नजाकतीच्या शेरोशायरी, सूर-तालाच्या संगमातून सादर झालेल्या कव्वालीने विद्यापीठात एक वेगळे वातावरण निर्माण केले. रसिकांच्या गर्दीने सभागृह खचाखच भरले होते.

देशभक्तिपर आणि पारंपरिक या प्रकारांमध्ये कव्वालीचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. दरम्यान, उद्घाटनाच्या कार्यक्रमात परीक्षक सईद खान, रियाझ खान, भारती वैशंपायन यांचे डॉ. स्वरूपा पाटील यांनी स्वागत केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव यांनी आभार मानले.

समारोप आजया स्पर्धेत देशभरातील आठ संघ सहभागी झाले आहेत. त्यातील पाच संघांनी पहिल्या दिवशी सादरीकरण केले. आज, मंगळवारी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ नांदेड, संत गागडेबाबा विद्यापीठ अमरावती आणि महर्षी दयानंद विद्यापीठ रोहतकचे संघ सादरीकरण करणार आहेत. दुपारी चार वाजता बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होईल. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर