CoronaVIrus In Kolhapur : एमआयडीसीसह सर्व उद्योग रविवारपासून आठ दिवस बंद राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 16:26 IST2021-05-13T16:22:52+5:302021-05-13T16:26:22+5:30
CoronaVIrus In Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व एमआयडीसी (औद्योगिक वसाहती) सह सर्व उद्योग, कारखाने रविवार (दि. १६ मे ) पुढील आठ दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय उद्योजकीय संघटनांनी घेतला आहे, अशी माहिती आमदार चंद्रकांत जाधव यांनी गुरूवारी दिली.

CoronaVIrus In Kolhapur : एमआयडीसीसह सर्व उद्योग रविवारपासून आठ दिवस बंद राहणार
कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व एमआयडीसी (औद्योगिक वसाहती) सह सर्व उद्योग, कारखाने रविवार (दि. १६ मे ) पुढील आठ दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय उद्योजकीय संघटनांनी घेतला आहे, अशी माहिती आमदार चंद्रकांत जाधव यांनी गुरूवारी दिली.
सध्या लॉकडाऊन सुरू असला, तरी कोरोनाबाबतच्या सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅॅनिटायझरचा वापर, आदी नियमांचे पालन करून एमआयडीसी, उद्योग, कारखाने सुरू आहेत. जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शनिवार (दि. १५) ते रविवार (दि. २३) पर्यंत आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. त्यापार्श्वभूमीवर या लॉकडाऊनमध्ये सहभागी होण्याबाबतची भूमिका उद्योजकीय संघटनांच्या प्रतिनिधींनी आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत जाहीर केली.
शनिवारी (दि. १५) मध्यरात्रीपासून दि. २३ मेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील उद्योग, कारखाने वगळता अन्य उद्योग, कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर उद्योजकांनी केलेल्या काही मागण्या शासनापर्यंत पोहोचविणार असल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले. यावेळी स्मॅकचे अध्यक्ष अतुल पाटील, गोशिमाचे अध्यक्ष श्रीकांत पोतनीस, मॅॅकचे अध्यक्ष गोरख माळी, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे आदी उपस्थित होते.