अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राज्यातील १५१ तालुका कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 19:42 IST2020-10-26T19:39:19+5:302020-10-26T19:42:25+5:30

maratha, dasara, kolhapurnews विजयादशमीच्या मुहूर्तावर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने राज्यातील १५१ तालुक्यांची विस्तृत कार्यकारिणी मुंबई, पुणे व कोल्हापूर येथून झालेल्या ऑनलाईन बैठकीद्वारे या महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. शशिकांत पवार यांनी जाहीर केली. महासंघाच्या सर्वांना उपयुक्त असणाऱ्या मोबाईल ॲपचा प्रारंभ करण्यात आला.

All India Maratha Federation announces 151 taluka executives in the state | अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राज्यातील १५१ तालुका कार्यकारिणी जाहीर

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राज्यातील १५१ तालुका कार्यकारिणी जाहीर

ठळक मुद्देअखिल भारतीय मराठा महासंघाच्या राज्यातील १५१ तालुका कार्यकारिणी जाहीरमोबाईल ॲपचा प्रारंभ : वसंतराव मुळीक यांच्यावर पश्चिम विभागाची जबाबदारी

कोल्हापूर : विजयादशमीच्या मुहूर्तावर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने राज्यातील १५१ तालुक्यांची विस्तृत कार्यकारिणी मुंबई, पुणे व कोल्हापूर येथून झालेल्या ऑनलाईन बैठकीद्वारे या महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. शशिकांत पवार यांनी जाहीर केली. महासंघाच्या सर्वांना उपयुक्त असणाऱ्या मोबाईल ॲपचा प्रारंभ करण्यात आला.

यावेळी महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे, संयुक्त सरचिटणीस दिलीपदादा जगताप, उपाध्यक्ष विनायकराव पवार, उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, चिटणीस प्रमोद जाधव प्रमुख उपस्थित होते. संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या विचारांचा वारसा ते ध्येयधोरणे, शैक्षणिक व शेती शासकीय योजना, अन्य माहिती असणाऱे हे ॲप सर्वांना उपयुक्त ठरेल.

मराठा महासंघाच्या १२० व्या वर्धापनदिनी प्रतिवर्षाप्रमाणे मुंबई येथील केंद्रीय कार्यालयात शस्त्र पूजन करण्यात आले. आरक्षण लढ्यात पूर्ण ताकदीने उतरण्यासाठी संपूर्ण राज्यभर दौऱ्याचे नियोजन करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. त्यातील पश्चिम विभागासह, गोवा, कर्नाटक राज्याची जबाबदारी राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्यावर सोपविण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील १२ तालुके, कोल्हापूर शहर, इचलकरंजी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती मारुती मोरे आणि शशिकांत पाटील यांनी दिली.

Web Title: All India Maratha Federation announces 151 taluka executives in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.