शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आजरा साखर कारखाना बेअरींग चोरीप्रकरण: प्रभारी कार्यकारी संचालकासह पाच जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 13:26 IST

कारखान्यातील प्रमुख अधिकाऱ्यांना बेअरींग चोरी प्रकरणी अटक झाल्यामुळे आजरा तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ

आजरा : आजरा साखर कारखान्यातील बेअरींग चोरीप्रकरणी  पाच जणांना आजरा पोलिसांनी अटक केली आहे. संशयित आरोपी मध्ये स्क्रॅप खरेदीदार, कारखान्याचे तत्कालीन कार्यकारी संचालक, सेवानिवृत्त सुरक्षा मुख्याधिकारी, स्टोअर कीपर, सुरक्षारक्षक यांचा समावेश आहे. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक सुनिल हारुगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. कारखान्यातील प्रमुख अधिकाऱ्यांना बेअरींग चोरी प्रकरणी अटक झाल्यामुळे आजरा तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.बेअरींगची अंदाजे किंमत ३ लाख रुपयेआजरा साखर कारखान्यावरून २७ फेब्रुवारी २०१९ ते २७ जुलै २०१९ या कालावधीत २७० किलोची ४  व ९२  किलोची २ बेअरींग अशी ६ बेअरींग अंदाजे ३ लाख ५ हजार २०० रुपये किंमतीची चोरीस गेली. याबाबतची फिर्याद तत्कालीन कार्यकारी संचालक प्रकाश चव्हाण यांनी आजरा पोलिसात दिली होती.पोलिसांनी केलेल्या तपासात स्क्रॅप खरेदीदार जेन्युअल शमशाद खान ( रा. योगायोग नगर, पुजारी मळा इचलकरंजी ) तत्कालीन कार्यकारी संचालक प्रकाश रामचंद्र चव्हाण ( वय ५२ रा. पेद्रेवाडी ) स्टोअर कीपर दिनकर उर्फ गुलाब बाबुराव हसबे ( रा.चांदेवाडी ) सेवानिवृत्त सुरक्षा मुख्य अधिकारी भरत गणपती तानवडे ( ६२  रा. देवर्डे )  सुरक्षारक्षक मनोहर यशवंत हसबे ( ४९ रा.चांदेवाडी ) यांना पोलिसांनी अटक केली आहे.जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. शैलेश बलकवडे,  अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड,  पोलीस उप अधीक्षक राजीव नवले, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे, सहाय्यक फौजदार बी.एस. कोचरगी, शिवाजी बामणे, संतोष गस्ती, दत्तात्रय शिंदे,  अजित हट्टी यांनी बेअरींग चोरी प्रकरणाचा तपास केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेCrime Newsगुन्हेगारी