शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

आर्या आंबेकर, रोहित राऊतची मंगळवारी लाइव्ह कॉन्सर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 4:32 PM

सुरेल गायकी आणि लाघवी अभिनयाने अल्पावधीतच मराठी रसिकांच्या मनावर मोहिनी घातलेली गायिका व ‘लोकमत’च्या सूर ज्योत्स्ना या राष्ट्रीय संगीत पुरस्काराची विजेती आर्या आंबेकर व सिनेगायक रोहित राऊत यांचा ‘लोकमत’च्या वतीने मंगळवारी (दि. २) लाइव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पुरस्कार विजेते शिखर नाद कुरेशी यांचेही गायन होणार आहे.

ठळक मुद्देआर्या आंबेकर, रोहित राऊतची मंगळवारी लाइव्ह कॉन्सर्टसूर ज्योत्स्ना पुरस्कार विजेते : शिखर नाद कुरेशीचीही उपस्थिती

कोल्हापूर : सुरेल गायकी आणि लाघवी अभिनयाने अल्पावधीतच मराठी रसिकांच्या मनावर मोहिनी घातलेली गायिका व ‘लोकमत’च्या सूर ज्योत्स्ना या राष्ट्रीय संगीत पुरस्काराची विजेती आर्या आंबेकर व सिनेगायक रोहित राऊत यांचा ‘लोकमत’च्या वतीने मंगळवारी (दि. २) लाइव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पुरस्कार विजेते शिखर नाद कुरेशी यांचेही गायन होणार आहे.नव्या पिढीतील गायकांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी, यासाठी ‘लोकमत’तर्फे ‘सूर ज्योत्स्ना’ या राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गायिका आर्या आंबेकर व शिखर नाद कुरेशी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारप्राप्त कलाकारांचा रंगारंग गाण्यांचा कार्यक्रम प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी कोल्हापूरकर रसिकांना मिळणार आहे. केशवराव भोसले नाट्यगृहात दुपारी चार वाजता हा कार्यक्रम होईल. यात सिनेगायक रोहित राऊत हादेखील सुरेल गाणी साद करणार आहे.या कार्यक्रमासाठी ‘सखी’ सदस्यांना ‘लोकमत’च्या शहर कार्यालयातून सकाळी अकरा वाजल्यापासून प्रवेशिका दिल्या जातील. प्रवेशिकांची संख्या मर्यादित असल्याने प्रथम येणाऱ्या सखींना प्राधान्य असेल. या कार्यक्रमासाठी केवळ निमंत्रितांनाच उपस्थित राहता येईल.आर्या आंबेकरआर्याचा जन्म नागपूरचा. समीर आणि श्रुती आंबेकर या मराठी दाम्पत्याची ही मुलगी. आर्याचे वडील समीर हे डॉक्टर असून आई श्रुती गायिका आहे. आर्या आईकडून गायनाचे शिक्षण घेत आहे. आर्याची आजीसुद्धा शास्त्रीय गायिका असून त्यांनी आर्या दोन वर्षांची असतानाच तिचे गायनातील कौशल्य ओळखले. आर्या साडेपाच वर्षांची असताना तिने आईकडे शास्त्रीय गायनाचे धडे गिरविण्यास सुरुवात केली.आर्याच्या सांगीतिक प्रवासाला ‘सारेगमप लिटल चॅम्प’ने खरा आयाम दिला. आर्याने आतापर्यंत अनेक मराठी, हिंदी अल्बम्स तसेच काही मराठी चित्रपटांसाठी व नाटकांसाठी गाणी गाइली आहेत. गायनासोबतच आर्या अभिनेत्री म्हणूनही समोर आली आहे. २०१७ च्या सुरुवातीस प्रदर्शित झालेल्या ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून तिने अभिनयाच्या कारकिर्दीस सुरुवात केली.

यामध्ये तिने गायलेले ‘हृदयात वाजे समथिंग’ हे गाणे प्रसिद्ध आहे. आर्याला आवाजाची दैवी देणगी लाभली आहे. त्याला आपल्या रियाजाची जोड देत तिने संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. शास्त्रीय संगीत असो वा नाट्यगीते, भावगीते असोत वा भक्तिगीते. मराठी चित्रपट संगीत असो वा हिंदी गाणी; इतकेच नव्हे तर, लावणी, लोकगीते या सर्व शैलींतील गाणी ती तितक्याच ताकदीने गाते.

शिखर नाद कुरेशीशिखर नाद कुरेशी हे महान शास्त्रीय संगीत कलावंत तौफिक कुरेशी यांचे चिरंजीव व शिष्य. ख्यातनाम तबलावादक उस्ताद अल्लारखॉँ यांचे नातू आणि उस्ताद झाकीर हुसेन यांचे पुतणे होत. त्यांच्या वडिलांनी तबलावादन कलेचा आफ्रिकन ड्रम डीजैबेवर प्रयोग केला होता. शिखर नाद कुरेशी यांनी ही संकल्पना पुढे नेली. त्यांनी लोकप्रिय कलावंत विक्कू विनायकरामजी व काका उस्ताद झाकीर हुसेन यांच्यासोबत अनेक कार्यक्रम सादर केले. तसेच, लुईस बॅँकस, रणजित वारोत, निलाद्रीकुमार व शंकर महादेवन यांच्यासोबतही विविध कार्यक्रमांत ते सहभागी झाले.

ते पुरबयान चॅटर्जी, रवी चॅरी, विजय प्रकाश, राहुल देशपांडे या भारतीय कलावंतांसह आंतरराष्ट्रीय कलावंत जॉर्ज ब्रुक्स, टॉर्स्टेन डी विंकेल, मार्कस गिलमोरे आणि बॉलिवूडमधील महालक्ष्मी अय्यर, सलीम-सुलेमान, शंकर-एहसान-लॉय यांच्यासोबत ते नियमित कार्यक्रम करीत असतात. बॉलिवूड चित्रपटांकरिता ते संगीतरचना करीत असतात. त्यांनी आयएसएल, आयपीएल, ब्रिक्स समिट गोवा, पॅसिफिक नेशन्स मीट जयपूर, इत्यादी कार्यक्रमांसाठी तयार करण्यात आलेल्या संगीतात योगदान दिले. त्यांनी विविध सूफी पॉप अल्बम्सची निर्मिती केली व मराठी चित्रपट ‘झिपऱ्या’ला पार्श्वसंगीत दिले.रोहित राऊत‘सारेगमप लिटल चॅम्प’ कार्यक्रमाद्वारे घराघरांत पोहोचलेले रोहित राऊत यांनी ‘हिंदी सारेगमप मेगा चॅलेंज’ या कार्यक्रमात विजेतेपद पटकावले. त्यांनी ‘दुनियादारी’ या चित्रपटासाठी पार्श्वगायन केले आहे. आजवर त्यांनी १०० हून अधिक चित्रपटांच्या शीर्षकगीतांसाठीही गायन केले आहे. कॉफी आणि बरंच काही, प्यारवाली लव्ह स्टोरी, शिनमा, ती सध्या काय करते, बॉईज २, बसस्टॉप, आनंदी गोपाळ, का रे दुरावा ही त्यांतील ठळक नावे. याशिवाय त्यांनी विविध गाजलेल्या मालिकांचे संगीत दिग्दर्शन केले आहे. सारेगमप संगीतसम्राट, तुमचं आमचं जमलं या कार्यक्रमांसाठी त्यांनी निवेदकाची भूमिकाही पार पाडली आहे. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, मिरची म्युझिक अवॉर्ड अशा मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :Sur Jyotsna National Music Award 2018सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार २०१८kolhapurकोल्हापूर