भाजप कोल्हापूर महानगर प्रवक्तेपदी अजित ठाणेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 18:59 IST2021-08-05T18:58:25+5:302021-08-05T18:59:22+5:30
Bjp Kolhapur : कोल्हापूर महानगरपालिकेतील माजी गटनेते अजित ठाणेकर यांची कोल्हापूर महानगर भाजपच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी त्यांना गुरूवारी नियुक्तीचे पत्र दिले.

भाजप कोल्हापूर महानगर प्रवक्तेपदी अजित ठाणेकर
कोल्हापूर : महानगरपालिकेतील माजी गटनेते अजित ठाणेकर यांची कोल्हापूर महानगर भाजपच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी त्यांना गुरूवारी नियुक्तीचे पत्र दिले.
गेली २१ वर्षे पक्षात कार्यरत असलेल्या ठाणेकर यांनी एक अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांनी महानगरपालिकेत ठसा उमटवला आहे. थेट पाईपलाईन योजना, जयंती नाला विद्युतीकरण, कचरा कंटेनर आणि घरफाळा विषयातील अनेक गैरप्रकारांना त्यांनी तोंड फोडले होते.
महापुरात नेहमी पाण्याखाली जाणाऱ्या पंपिंग स्टेशन च्या नुतानीकरणासाठी ते आग्रही होते. त्यांचे हे योगदान लक्षात घेवून त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व नेतेमंडळींनी दाखवलेला विश्वास आपण प्रत्यक्ष कामातून सार्थ ठरवू अशी प्रतिक्रिया ठाणकेर यांनी व्यक्त केली आहे.