शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

आजरा कारखाना निवडणूक: सतेज पाटील, विनय कोरे गटाने उधळला पहिला गुलाल; संभाजी पाटील यांची बिनविरोध निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 16:25 IST

आजरा : आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील व आमदार विनय कोरे गटाला विजयाचा पहिला गुलाल लागला. माघारीदिवशी ...

आजरा : आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील व आमदार विनय कोरे गटाला विजयाचा पहिला गुलाल लागला. माघारीदिवशी भटक्या विमुक्त जाती गटातून शिवसेनेचे संभाजी पाटील यांची बिनविरोध निवडून झाली. बजाजी मिसाळ यांनी माघार घेतल्याने चराटी - शिंपी - रेडेकर - शिंत्रे गटाला पहिल्यांदाच यश मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शेवटच्या टप्प्यात पॅनेल उभे केल्याने दुरंगी लढत होणार आहे.गेल्या पाच दिवसांपासून या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय आघाडी करण्याचा प्रयत्न मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे हे करत होते. परंतु जागा वाटपानंतर अचानक राष्ट्रवादीने निवडणूकच न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सतेज पाटील, विनय कोरे यांनी एकत्र येत आपली आघाडी जाहीर केली. परंतु कार्यकर्त्यांच्या दबावामुळे अखेर माघारीच्या दिवशी सकाळी निवडणूक रिंगणात उतरवण्याचा निर्णय हसन मुश्रीफ यांना घ्यावा लागला.  मात्र, अर्ज माघारीदिवशीच भटक्या विमुक्त जाती गटातून बजाजी मिसाळ व विकास बागडी यांनी माघार घेतल्याने संभाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली. यामुळे देवचाळोबा विकास आघाडीला पहिलेच यश मिळाले. छानणीनंतर १४६ अर्ज पात्र ठरले होते. त्यापैकी ९९ जणांनी आज माघार घेतली तर ४७ अर्ज शिल्लक राहिले आहेत. २० जागेसाठी ४१ अर्ज व ६ अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलVinay Koreविनय कोरे