शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

कोल्हापूर :शहरातील हवा प्रदूषण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 1:01 PM

या अधिविभागाने करवीरनिवासिनी अंबाबाईचे मंदिर परिसर आणि महाद्वार रोड, शिवाजी विद्यापीठ परिसर आणि दाभोळकर कॉर्नर ते सीबीएस स्टँड परिसरात दि. ६ ते १२ एप्रिल या कालावधीमध्ये हवा प्रदूषणाचे मापन केले. त्याची तुलना दि. १६ ते २२ मार्च दरम्यानच्या मापनासमवेत केली. एप्रिलमधील मापनात एसओटूचे प्रमाण मार्चमधील लॉकडाऊनच्या कालावधीतील सरासरीपेक्षा ४० टक्क्यांनी कमी झाले आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवरील एसओटू, एनओएक्स,आरएसपीएमचे प्रमाण निम्म्यावर; लॉकडाऊनमधील चित्र

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील ‘जनता कर्फ्यू’नंतर जाहीर झालेल्या लॉकडाऊनमध्ये कोल्हापूर शहरातील हवा प्रदूषणाचे मापन शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र अधिविभागाने केले. त्यामध्ये हवेतील सल्फर डायआॅक्साईड (एसओटू), नायट्रोजन डायआॅक्साईड (एनओटू), सूक्ष्म धूलीकणांचे प्रमाण (आरएसपीएम) कमी झाल्याचे दिसून आले.

या अधिविभागाने करवीरनिवासिनी अंबाबाईचे मंदिर परिसर आणि महाद्वार रोड, शिवाजी विद्यापीठ परिसर आणि दाभोळकर कॉर्नर ते सीबीएस स्टँड परिसरात दि. ६ ते १२ एप्रिल या कालावधीमध्ये हवा प्रदूषणाचे मापन केले. त्याची तुलना दि. १६ ते २२ मार्च दरम्यानच्या मापनासमवेत केली. एप्रिलमधील मापनात एसओटूचे प्रमाण मार्चमधील लॉकडाऊनच्या कालावधीतील सरासरीपेक्षा ४० टक्क्यांनी कमी झाले आहे. एनओटूचे प्रमाण २५ टक्क्यांनी, तर आरएसपीएमचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी झाले आहे. एसओटू, एनओटू आणि आरएसपीएमचे प्रमाण हे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानांकनापेक्षा ५० टक्क्यांनी कमी झाले आहे. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधक विद्यार्थी चेतन भोसले, फिल्ड असिस्टंट अजय गौड, अमित माने यांनी प्रदूषण मापनाचे काम केल्याची माहिती पर्यावरणशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. पी. डी. राऊत यांनी सोमवारी दिली.लॉकडाऊनमधील हवेतील प्रदूषकांचे प्रमाणठिकाण महिना एसओटू एनओटू आरएसपीएमदाभोळकर कॉर्नर मार्च(दि. १६ ते २२) २६.१९ ४५.१५ १२८.४७एप्रिल(दि. ६ ते १२) १८.४५ ३०.८२ ७४.६५महाद्वार रोड मार्च २०.५९ ३७.५१ ९८.९६एप्रिल १३.६१ २५.५४ ५३.८२शिवाजी विद्यापीठ मार्च १२.१५ १७.५४ ५७.९९एप्रिल ७.१३ १२.७२ ४२.३६

मानांकन असे (युजीपरमीटर (मिलिग्रॅममध्ये)*सल्फर डायआॅक्साईड : ८०*नायट्रोजन डायआॅक्साईड : ८०*सूक्ष्म धूलीकण : १०० 

लॉकडाऊनमुळे वाहतूक बंद असणे, औद्योगिक क्षेत्र, व्यावसायिक आस्थापना आणि हॉटेल, बेकरी आदींतून बाहेर पडणारा धूर, रस्त्यावर जाळला जाणारा कचरा बंद झाल्याने हवेतील प्रदूषके कमी झाली आहेत.- डॉ. पी. डी. राऊत 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरpollutionप्रदूषण