शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी मनसे प्रमुख राज ठाकरे लोकल ट्रेनने चर्चगेटला पोहोचले
2
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
3
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
4
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
5
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
6
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
7
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
8
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?
9
UPI New Rules: ३ नोव्हेंबरपासून युपीआय पेमेंटमध्ये होणार मोठा बदल! पटापट करा चेक
10
"मी दोन दिवसांपूर्वीच रोहित आर्याला भेटलेलो...", मराठी अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "त्याच्यावर शंका आली नाही कारण..."
11
Tarot Card: नवा उत्साह, चैतन्य आणि आशादायी चित्र घेऊन येणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
12
ग्रहण योग-अशुभ पंचकात कार्तिकी एकादशी: १० राशींचा भाग्योदय-भरघोस भरभराट; विठुराया शुभ करेल!
13
भारतीय वंशाच्या उद्योजकाने अमेरिकेत चुना लावला अन् पसार झाला; ४,००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप
14
IND vs SA World Cup Final: भारत-दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पावसात रद्द झाल्यास काय? २००२ मध्ये भारतासोबत काय झालेले...
15
Shocking!! कॅप्टन बनताच Bigg Boss 19च्या घरातून बेघर झाला प्रणित मोरे? एलिमिनेशनमध्ये मोठा ट्विस्ट
16
Wife च्या नावे पोस्टाच्या या स्कीममध्ये ₹८०००, ५ वर्षांत होईल धनवर्षाव; पाहा कमाईचं संपूर्ण गणित
17
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
18
“कार्तिकी एकादशीच्या महापूजेपूर्वीच विठुरायाने ठाण्यात अवतरून मला दर्शन दिले”: एकनाथ शिंदे
19
LPG Cylinder Price Cut:आजपासून गॅस सिलिंडरची किंमत झाली कमी, पाहा तुमच्या शहरात काय आहेत नवे दर?
20
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश

गुन्हा कराल तर खैर नाही; निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापूर पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांना दम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 17:24 IST

सराईतांची गर्दी

कोल्हापूर : गेल्या दहा वर्षांत दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांची शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी हजेरी घेतली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. २८) शहर पोलिस उपअधीक्षक कार्यालयात १०४ गुन्हेगारांची ओळख परेड घेऊन त्यांना कडक शब्दात समज देण्यात आली. यापुढे गुन्हा केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा उपअधीक्षक पाटील यांनी गुन्हेगारांना दिला.आगामी निवडणुकांमध्ये सराईत गुन्हेगारांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाया करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिले आहेत. त्यानुसार शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी राजारामपुरी, शाहूपुरी, जुना राजवाडा आणि लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांना हजर करण्याच्या सूचना प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.गेल्या १० वर्षांत दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या १०४ गुन्हेगारांनी शहर पोलिस उपअधीक्षक कार्यालयात हजेरी लावली. यात त्यांची ओळख परेड घेण्यात आली. ते सध्या काय करीत आहेत? त्यांच्या आर्थिक उत्पन्नाचे स्रोत काय आहेत? त्यांच्यावर नवीन कोणते गुन्हे दाखल झाले आहेत काय? त्यांचा काही गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध आहे काय? याची माहिती घेण्यात आली.उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी गुन्हेगारांची ओळख परेड घेऊन त्यांना कडक शब्दांत सूचना दिल्या. चोरी, मारामारी, खंडणी उकळणे, अंमली पदार्थांची विक्री करणे, दारूची तस्करी, गँगवॉर अशा गुन्ह्यांमध्ये पुन्हा आढळल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. तसेच संघटित गुन्हेगारी आणि झोपडपट्टी दादांची दहशत मोडून काढण्यासाठी विशेष मोहीम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पोलिस निरीक्षक संतोष डोके, संजीव झाडे, सुशांत चव्हाण आणि सहायक पोलिस निरीक्षक दिगंबर गायकवाड उपस्थित होते.सराईतांची गर्दीराजारामपुरी परिसरातील एसपी गँग, आरसी गँग, राजेंद्रनगर, यादवनगर, टेंबलाई नाका झोपडपट्टी यासह सदर बाजार, शिवाजी पार्क, ताराराणी चौक, रुईकर कॉलनी, वारे वसाहत, फुलेवाडी रिंगरोड येथील सराईत गुन्हेगार उपस्थित होते. घरफोड्या करणारा सराईत चोरटा गुरुदत्त पोळ याचीदेखील पोलिसांनी हजेरी घेतली.

पोलिस ठाणेनिहाय गुन्हेगार

  • राजारामपुरी - ४०
  • शाहूपुरी - २४
  • जुना राजवाडा - २३
  • लक्ष्मीपुरी - १७
English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Police Warn Criminals Ahead of Elections: No Mercy!

Web Summary : Kolhapur police warned repeat offenders of strict action during upcoming elections. 104 criminals attended a police 'roll call' and were cautioned against illegal activities like theft, extortion, and drug trafficking. Police aim to curb organized crime and slumlord terror.