शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

मटक्याचा अड्डामालक बनला ‘एजंट’

By admin | Updated: November 10, 2014 00:44 IST

जिवलग दोस्त माझे मालक : विजय पाटील याचा गोपनीय जबाब

एकनाथ पाटील - कोल्हापूर --पोलीस खात्याची नोकरी अर्ध्यावर सोडून, खात्यातील निवडक सहकाऱ्यांना हाताशी धरून जिल्ह्यात मटका व्यवसाय फोफावून करोडो रुपये जमा करणारा मटकाअड्डा मालक विजय पाटील स्वत: एजंट असल्याची बतावणी पोलिसांना करीत आहे. व्यवसायात मदत करणाऱ्या अनेक पोलिसांना त्याने देशोधडीला लावलेच; परंतु आता जुन्या दोस्तांची नावे घेऊन त्यांनाही रस्त्यावर आणण्याचा तो प्रयत्न करीत आहे. जुना राजवाडा पोलिसांना दिलेल्या गोपनीय जबाबामध्ये त्याने दोस्त उमेश खंडेराव पाटील (रा. निचितेनगर) व जनार्दन दगडू जाधव (रा. न्यू पॅलेस) हे आपले मटकाअड्डा मालक असल्याचे सांगून पोलिसांची झोप उडविली. स्वत:च्या बचावासाठी सरड्यांसारखा रंग बदलणारा ‘विजय’ कधी कोणाचा घात करील, हे सांगता येत नसल्याने पोलीसही त्याच्यापासून चार हात लांब राहूनच तपास करीत आहेत. तो पूर्वी पोलीस खात्यामध्ये होता; त्यामुळे त्याला कायदा चांगलाच माहीत! झटपट पैसे कमाविण्यासाठी खाकी वर्दीला त्याने अर्ध्यावरच रामराम ठोकला आणि अवैध व्यवसायात पदार्पण केले. त्या काळी मटका म्हणजे लोकांना माहीत नव्हते; परंतु ‘झटपट श्रीमंतीचा मार्ग’ अशी जाहिरात करून त्याने जिल्ह्यात मटका पसरवला. गुन्हेगारीशी संबंधित तरुणांना त्याने एजंट बनविले. कारवाई रोखण्यासाठी पोलिसांना हाताशी धरले. हप्तेगिरी करत त्याने करोडो रुपयांची माया जमविली. पाच-सहा वर्षांपूर्वी व्यवसायात भागीदार असलेल्या पोलिसांशी त्याचे बिनसले आणि कधीही न होणाऱ्या मटक्यावर कारवाई होऊ लागली. आपलेच खाऊन आपल्याच घराचे वासे मोजणाऱ्या पोलिसांचा बदला घेण्यासाठी त्याने थेट करवीरच्या चौघा पोलिसांची हप्ते घेतानाची चित्रफीत बनविली आणि त्यातून ते पोलीस निलंबित झाले. मटक्याचे नेटवर्क सांभाळणारा व ‘विजयचा उजवा हात’ म्हणून ओळखला जाणारा पोलीस फिरोज मुल्ला याला तर कायमचे घरी बसावे लागले. जिल्ह्याच्या पोलीस खात्यात अधीक्षकांपासून ते निरीक्षकांपर्यंत सारेच नवीन आल्याने आपण मटका व्यवसाय बंद केल्याचा कांगावा करीत मटका व्यवसाय करणाऱ्या अनेकांच्या नावांचे निवेदन त्याने पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांना दिले. पोलीस आपणाला विनाकारण लक्ष्य करीत असल्याचा आरोपही त्याने केला. पोलिसांबरोबर प्रसारमाध्यमांचीही त्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. छुप्या मार्गाने मंगळवार पेठेत आॅनलाईन लॉटरी सेंटरची शक्कल लढवीत मटका घेण्यास सुरुवात केली आणि त्याचा हा डाव राजवाडा पोलिसांनी हाणून पाडला. दिवस भरले...मटक्याचे जाळे पसरविणाऱ्या विजय पाटील याला ‘मोक्का’ लावण्याच्या पोलिसांच्या हालचाली सुरू आहेत. राजवाडा पोलीस त्याच्या गुन्ह्यांची फाईल बनविण्यात व्यस्त आहेत. ही फाईल ते पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांच्या सहीने विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार शर्मा यांच्याकडे काही दिवसांत पाठविणार असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे ‘मटका मालक ते चक्क एजंट’ असा प्रवास केलेल्या विजयचे दिवस आता भरले असल्याचे पोलीस सांगत आहेत.