शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: मोजणीनंतर अमेरिकन मिशन जमिनीवरील अतिक्रमणे काढणार, विभागीय आयुक्तांच्या निकालानंतर धावाधाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 15:59 IST

नगर भूमापन विभागास पत्र

कोल्हापूर : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारील मोक्याची आणि कोट्यवधी रुपयांची अमेरिकन मिशन नावाची ५७ एकर १७ गुंठे जमीन सरकारचीच असल्याचा महत्त्वपूर्व निकाल पुणे विभागाच्या अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदी यांनी दिल्यानंतर करवीरचे तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी बुधवारी जमीन मोजणीसाठी शहर भूमी अभिलेख कार्यालयाकडे अर्ज दिला आहे. मोजणीनंतर अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येणार आहे.दरम्यान, जमिनीशी हितसंबंध असलेल्यांचे निकालाने धाबे दणाणले आहे. ते दिवसभर महसूल, भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांकडे धावाधाव करीत असल्याचे दिसले. मात्र, विभागीय आयुक्तांच्या आदेशाची अंमलबाजवणी संबंधित अधिकाऱ्यांना करावी लागणार आहे. त्यामुळे अंमलबजावणी तातडीने करावी, अशी मागणीही प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे प्रमुख दिलीप देसाई यांनी एका पत्राद्वारे करवीर तहसील प्रशासनाकडे केली आहे.जमिनीचा सत्ता प्रकार बदलासंबंधीच्या तक्रारीवरून तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दीर्घ सुनावणी घेऊन निकाल दिला. निकालाला विभागीय आयुक्तांकडे आव्हान दिल्यामुळे अतिक्रमण काढण्याची कारवाई करता आली नाही. पण, आता विभागीय आयुक्तांनीच रेखावार यांचा निकाल कायम केल्याने करवीर तहसीलदार यांना अतिक्रमण काढण्याची कारवाई करावी लागणार आहे. म्हणूनच त्यांनी जमीन मोजणीसंबंधीचा अर्ज भूमापन प्रशासनाकडे दिला आहे.रेखावार यांच्या आदेशानुसार जमिनीचा ब सत्ताप्रकार म्हणजे शासकीय हक्क कमी करण्यासाठी दोषी असलेले त्यावेळच्या नगरभूमापन विभागाच्या अधिकारी यांच्याविरोधात शिस्तभंगाच्या कार्यवाहीचा प्रस्ताव निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना पाठवावा लागणार आहे. करवीर प्रांताधिकाऱ्यांना वाद मिळकतीमधील सर्व व्यवहाराची व अनियमिततेची सविस्तर चौकशी करून शर्तभंगाची कार्यवाही रेखावार यांच्या निकालानुसार करावी लागणार आहे. मात्र, या प्रकरणात वरिष्ठ अधिकारीही असल्याने कारवाईसंबंधी काय होणार याकडे कोल्हापूरकरांना उत्सुकता लागून राहिली आहे.

पत्र पोहोचलेच नाही..जमीन मोजणीसाठी करवीर तहसील कार्यालयाकडून नगर भूमापनला अर्ज दिल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर ‘लोकमत’ने नगर भूमापन कार्यालयाकडे चौकशी केल्यानंतर सायंकाळी सातपर्यंत पत्र आलेले नाही, असे सांगण्यात आले.

अमेरिकन मिशन जमीन मोजणीसाठी शहर नगरभूमापन कार्यालयास पत्र दिले आहे. मोजणीनंतर अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येईल. - स्वप्निल रावडे, तहसीलदार, करवीर.