कोल्हापूर : करवीर तालुक्यातील दिंडनेर्ली येथे कोल्ह्याच्या चाव्यात चौघे जखमी झाले. ही घटना रविवारी (दि. १६) पहाटे तीन ते सकाळी आठच्या दरम्यान गावात आणि शेतात घडली. जखमींवर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत.सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, दिंडनेर्ली येथे रविवारी पहाटेपासून एका कोल्ह्याने उच्छाद मांडला आहे. पहाटे शेतात कामासाठी गेलेले आणि मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या चौघांवर हल्ला करून त्याने चावा घेतला. यात विक्रम दिनकर पाटील (वय ६०), आकाश चंदर शिंदे (३२), पांडुरंग बंडू बोटे (७०) आणि बेबीताई यशवंत शिंदे (५०, सर्व रा. दिंडनेर्ली) जखमी झाले. जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. ग्रामस्थांवर हल्ला करणाऱ्या कोल्ह्याची शोध मोहीम स्थानिकांकडून सुरू आहे. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
Web Summary : A fox attacked and injured four people in Dindnerli, Kolhapur, early Sunday. The victims, attacked while working in fields or on morning walks, are receiving treatment. Locals are searching for the fox.
Web Summary : कोल्हापुर के दिंडनेर्ली में रविवार सुबह एक लोमड़ी ने हमला कर चार लोगों को घायल कर दिया। खेतों में काम करते या सुबह की सैर पर निकले पीड़ितों का इलाज चल रहा है। स्थानीय लोग लोमड़ी की तलाश कर रहे हैं।