इचलकरंजी : प्रभाग क्रमांक ६ मधील भाजपच्या एका कार्यकर्त्याची उमेदवारी नाकारल्याचे समजल्यानंतर विक्रमनगर भागातील काही महिला रस्त्यावर उतरून रडत दु:ख व्यक्त करू लागल्या. त्यामुळे उमेदवारही रडू लागले आणि वातावरण भावनिक बनले.भाजपचे दीपक पाटील हे प्रभाग क्रमांक ६ मध्ये सक्रिय होते. त्यांना उमेदवारी डावलल्याचे समजल्यानंतर विक्रमनगर भागातील संतप्त महिला रस्त्यावर उतरल्या. महिला व उमेदवारही रडू लागल्याने तेथील वातावरण धीर गंभीर बनले.
निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलून धनदांडग्यांना उमेदवारी दिल्याचा आरोप संतप्त महिलांनी केला. अखेर पोलिस आल्यानंतर महिला निघून गेल्या. अपक्ष निवडणूक लढविण्यासंदर्भात बुथमधील कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन निर्णय घोषित करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
Web Summary : Ichalkaranji: After a BJP worker, Deepak Patil, was denied candidacy in Ward 6, women protested in Vikramnagar. The emotional scene unfolded as women and the candidate wept, alleging preference for wealthy candidates. Police intervention eventually dispersed the crowd. Patil plans a meeting to decide on independent candidacy.
Web Summary : इचलकरंजी: वार्ड 6 से भाजपा कार्यकर्ता दीपक पाटिल की उम्मीदवारी खारिज होने पर विक्रम नगर में महिलाओं ने विरोध प्रदर्शन किया। महिलाओं और उम्मीदवार के रोने से माहौल गमगीन हो गया। प्रदर्शनकारियों ने धनी उम्मीदवारों को प्राथमिकता देने का आरोप लगाया। पुलिस के हस्तक्षेप के बाद भीड़ तितर-बितर हो गई। पाटिल निर्दलीय चुनाव लड़ने पर विचार कर रहे हैं।