Kolhapur News: चंदगडमध्ये हत्तीनंतर बिबट्याची एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 17:45 IST2025-12-20T17:42:28+5:302025-12-20T17:45:14+5:30
बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडल्याचे कॅमेऱ्यात कैद

Kolhapur News: चंदगडमध्ये हत्तीनंतर बिबट्याची एंट्री
चंदगड : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अण्णा’हत्तीचा वावर असतानाच आता बिबट्याची एंट्री झाली आहे. देसाईवाडी परिसरात बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. जीवितहानी होण्याआधी बिबट्याचा बंदोबस्त करा, अशी सक्त ताकीद आमदार शिवाजी पाटील यांनी वनविभागाला दिली.
दरम्यानच, वनक्षेत्रपाल तुषार गायकवाड, वनपाल कृष्णा डेळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी नागरिकांना जनजागृती करत मार्गदर्शन केले. वनविभाग दक्ष असून ध्वनीक्षेपकाद्वारेही चंदगड शहरात बिबट्याविषयी जनजागृती केल्याचे वनक्षेत्रपाल गायकवाड यांनी सांगितले.
संपूर्ण राज्यभर बिबट्याने धुमाकूळ घातला असून अनेक ठिकाणी जीवितहानी झाली आहे. त्यामुळे चंदगडसह परिसरातील नागरिकांसोबत वनविभाग सतत संवाद साधत आहे. नागरिकांनीही दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करून वनविभागाला सहकार्य करावे असे आवाहन वनविभागाने केले आहे.