सासूच्या निधनानंतर सुनेची आत्महत्या, घराच्या टेरेसवरुन घेतली उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 11:16 IST2019-03-09T11:07:59+5:302019-03-09T11:16:19+5:30

सासुच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने सुनेने राहत्या घराच्या टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना सानेगुरुजी रोडवरील आपटेनगर येथे घडली. मृत सुन शुभांगी संदीप लोखंडे (वय ३९) तर सासू मालती मधुकर लोखंडे (७०) अशी त्यांची नावे आहेत. शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

After the death of mother-in-law, Suene suicides, jump from the terrace of the house | सासूच्या निधनानंतर सुनेची आत्महत्या, घराच्या टेरेसवरुन घेतली उडी

सासूच्या निधनानंतर सुनेची आत्महत्या, घराच्या टेरेसवरुन घेतली उडी

ठळक मुद्देसासूच्या निधनानंतर सुनेची आत्महत्याघराच्या टेरेसवरुन घेतली उडी सानेगुरुजी-आपटेनगर येथील घटना

कोल्हापूर : सासुच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने सुनेने राहत्या घराच्या टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना सानेगुरुजी रोडवरील आपटेनगर येथे घडली. मृत सुन शुभांगी संदीप लोखंडे (वय ३९) तर सासू मालती मधुकर लोखंडे (७०) अशी त्यांची नावे आहेत. शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

 मधुकर लोखंडे हे मुळचे बागणी (ता. बागणी, ता. वाळवा, जि. सांगलीचे) ते व पत्नी मालती दोघेही शिक्षक असल्याने पन्नास वर्षापासून कोल्हापूरात आपटेनगर येथे राहतात. सानेगुरुजी रोड आपटेनगर चौकात त्यांचा रस्त्याला लागुनच तिन मजली बंगला आहे.

दोघेही सेवानिवृत्त आहेत. त्यांचा मुलगा संदीप लोखंडे हा खासगी वाहनावर चालकाचे काम करतो. सुन शुभांगी गृहीणी होती. या दोघांना शिवतेज (१६) नावाचा एकुलता मुलगा आहे. तो सध्या दहावी परिक्षा देतो.

मालती लोखंडे आजाराने अंथरुणाला खिळून होत्या. त्यांची देखभाल सुन शुभांगी करीत होती. गेल्या चार दिवसापासून त्यांची प्रकृत्ती खालावली होती. शनिवारी पहाटे मालती यांची प्रकृत्ती अत्यवस्थ होवून त्यांचे निधन झाले. हा धक्का सुन शुभांगी यांना सहन झाला नाही. त्या धावत तिसऱ्या मजल्यावर असलेल्या देवघरात गेल्या. येथील अंगारा घेवून सुनेने राहत्या घराच्या टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या केली.

दरम्यान या प्रकाराची माहिती जुनाराजवाडा पोलीसांना दिली. पोलीसांनी घटनास्थळी येवून पंचनामा करुन शुभांगीचा मृतदेह शववाहिकेतून सीपीआरला पाठविला आहे.

 

Web Title: After the death of mother-in-law, Suene suicides, jump from the terrace of the house