शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: भेसळयुक्त प्रसाद, अन्न औषध प्रशासन विभागाची जोतिबा डोंगरावर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 18:56 IST

२६ हजार रुपये किमतीच्या पेढ्यांसह आइस्क्रीम नष्ट करून टाकले

पोर्ले तर्फ ठाणे : जोतिबाच्या चैत्र यात्रेनिमित्त बाजारपेठेत प्रसाद म्हणून विक्रीला आलेल्या भेसळयुक्त आणि मुदतबाह्य झालेले २६ हजार रुपये किमतीच्या पेढ्यांसह आइस्क्रीम विकणाऱ्या टोळीवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने कारवाई करत पेढे आणि आइस्क्रीम नष्ट करून टाकले.श्री क्षेत्र जोतिबा डोंगराची चैत्र पौर्णिमेची यात्रा बुधवारी संपन्न होत आहे. या यात्रेत प्रसाद म्हणून विक्रीसाठी आइस्क्रीम, खाद्यपदार्थ आणि पेढ्यांची मोठ्या प्रमाणात होत असते. पेढ्यांमध्ये कर्नाटकात उत्पादन झालेले पेढे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणले जातात. हे पदार्थ भेसळयुक्त आणि भाविकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम करणारे असल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. त्या अनुषंगाने अन्न प्रशासनाच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून विक्रेत्यांच्या पदार्थांची तपासणी करून कारवाई केली जात आहे. 

Jyotiba Chaitra Yatra 2026: जोतिबा यात्रेचा गुलाली रंग..पाऊसधारा झेलत भाविक दंगअन्न प्रशासन विभागाने जोतिबा डोंगरावरील सर्व विक्रेत्यांच्या मालाची तपासणी सुरू केली आहे. दोन दिवसांत मुदत संपलेले, भेसळयुक्त आणि भाविकांच्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याने ते नष्ट करण्यात आले. २६ हजार रुपये किमतीचे पेढे आणि आइस्क्रीम विकणाऱ्या टोळीवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने कारवाई करत पेढे आणि आइस्क्रीम नष्ट करून टाकले असल्याचे माहिती अन्नसुरक्षा अधिकारी विजय पाचपुते यांनी सांगितले.

दरम्यान कारवाईवेळी पेढा आणि कलाकंद यांच्या प्रत्येक पॅकिंगवर उत्पादन तिथी आणि मुदत बाह्य तिथी लिहूनच विक्री करण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासन विभागाने दिला.

English
हिंदी सारांश
Web Title : Adulterated Prasad Seized at Jyotiba Temple; Food Administration Action

Web Summary : Food Administration seized adulterated pedhas and ice cream worth ₹26,000 at Jyotiba temple during the Chaitra Yatra. The products, deemed harmful to devotees' health, were destroyed. Vendors are now mandated to display manufacture and expiry dates on packaging.