अ‍ॅड्रेनल ग्रंथीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया- सीपीआरमधील डॉक्टरांना यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 01:14 IST2017-10-18T01:09:20+5:302017-10-18T01:14:02+5:30

कोल्हापूर : किडनीवरील भागावर असलेली अ‍ॅड्रेनल ग्रंथीची गाठ दुर्बिणीच्या शस्त्रक्रियेद्वारे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर)मध्ये काढण्यात आली.

Adrenal gland surgery by the telescope - The success of a CPR doctor | अ‍ॅड्रेनल ग्रंथीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया- सीपीआरमधील डॉक्टरांना यश

अ‍ॅड्रेनल ग्रंथीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया- सीपीआरमधील डॉक्टरांना यश

ठळक मुद्देरांगोळीतील महिला पोटदुखीने होती त्रस्त पोटात दुखून वारंवार चक्कर येत असल्यामुळे

कोल्हापूर : किडनीवरील भागावर असलेली अ‍ॅड्रेनल ग्रंथीची गाठ दुर्बिणीच्या शस्त्रक्रियेद्वारे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर)मध्ये काढण्यात आली. ‘महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजने’तून रांगोळी (ता. हातकणंगले) येथील सुमती राजगोंडा पाटील (वय ३२) या महिलेवर ही शस्त्रक्रिया विनामूल्य केली.

खासगी रुग्णालयात त्यासाठी सुमारे दीड-दोन लाख रुपये खर्च येतो. पश्चिम महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांमधील ही पहिलीच शस्त्रक्रिया असल्याची माहिती राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. रामानंद म्हणाले, सुमती पाटील या महिन्यापूर्वी सीपीआरमध्ये दाखल झाल्या. पोटात दुखून वारंवार चक्कर येत असल्यामुळे त्या त्रस्त होत्या. शस्त्रक्रिया विभागातील डॉ. विजय कस्सा व त्यांच्या पथकाने पाटील यांच्या सर्व तपासण्या केल्या. त्यामध्ये उजव्या अ‍ॅड्रेनलमध्ये साधारण चार सेंटीमीटर आकाराची अ‍ॅड्रेनल ग्रंथीची गाठ असल्याचे निदान झाले. सर्व तपासण्यांनंतर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय झाला.

डॉ. कस्सा यांच्यासह डॉ. वासिम मुल्ला, डॉ. सत्येंद्र ठोंबरे, डॉ. प्रसाद, डॉ. रजनीश यांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया केली. ती सुमारे दोन ते अडीच तास सुरू होती. त्यांना विभागप्रमुख डॉ. वसंतराव देशमुख, डॉ. शिवप्रसाद हिरूगडे, डॉ. उल्हास मिसाळ, डॉ. मारुती पवार यांचे सहकार्य लाभले.

पत्रकार परिषदेस वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, अभ्यागत समितीचे अशासकीय सदस्य सुनील करंबे, आदी उपस्थित होते.

इचलकरंजी येथे खासगी रुग्णालयात पहिल्यांदा उपचार घेतले. तेथे २० हजार रुपये बिल देऊनही काही उपयोग झाला नाही. अखेर ‘सीपीआर’मध्ये अ‍ॅड्रेनल ग्रंथीच्या गाठीचे निदान झाले. ही शस्त्रक्रिया विनामूल्य केली आहे. - सुमती पाटील, रांगोळी

Web Title: Adrenal gland surgery by the telescope - The success of a CPR doctor