शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

वैद्यकीय महाविद्यालयाच्या वाढीव जागांवर पुढील वर्षी प्रवेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 11:09 AM

कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मेडिकल कौन्सिलने वाढवून दिलेल्या ५० जागांवर प्रवेशाची कार्यवाही पुढील वर्षांपासून होणार असल्याचे दिसत आहे. या जागांवरील प्रवेशाबाबत महाविद्यालयाला अद्याप वैद्यकीय संचालनालय अथवा सामायिक प्रवेश प्रक्रिया कक्षाकडून (सीईटी सेल) निर्देश प्राप्त झालेले नाहीत.

ठळक मुद्देवैद्यकीय महाविद्यालयाच्या वाढीव जागांवर पुढील वर्षी प्रवेश!तिसऱ्या फेरीची गुुरुवारपर्यंत मुदत; सीईटी सेलकडून निर्देश नाही

कोल्हापूर : येथील राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मेडिकल कौन्सिलने वाढवून दिलेल्या ५० जागांवर प्रवेशाची कार्यवाही पुढील वर्षांपासून होणार असल्याचे दिसत आहे. या जागांवरील प्रवेशाबाबत महाविद्यालयाला अद्याप वैद्यकीय संचालनालय अथवा सामायिक प्रवेश प्रक्रिया कक्षाकडून (सीईटी सेल) निर्देश प्राप्त झालेले नाहीत.याबाबत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजित लोकरे यांनी सांगितले की, त्रुटींची पूर्तता केली नसल्याने या वैद्यकीय महाविद्यालयाच्या कमी केलेल्या ५० जागा इंडियन मेडिकल कौन्सिलने कायम ठेवल्या आहेत. कौन्सिलच्या निर्णयामुळे महाविद्यालयातील जागांची संख्या पूर्वीप्रमाणे १५० इतकी झाली आहे.

कायम केलेल्या ५० जागांवर यंदा की पुढीलवर्षी विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावयाचा, याबाबत सोमवारी सकाळी वैद्यकीय संचालनालय आणि सीईटी सेलकडे विचारणा केली. त्यासह प्रवेशाच्या अनुषंगाने काही मुद्द्यांवर चर्चा केली.

मात्र, सायंकाळपर्यंत सीईटी सेलकडून कोणतेही निर्देश प्राप्त झालेले नाहीत. तिसऱ्या फेरीची मुदत गुरुवारी (दि. १२) पूर्ण होणार आहे. त्यापूर्वी निर्देश आले, तर यंदा अन्यथा पुढील वर्षी या वाढीव जागांवर प्रवेश प्रक्रिया राबवावी लागणार आहे.

 

टॅग्स :Medicalवैद्यकीयEducationशिक्षणCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूर