Kolhapur: जयसिंगपुरच्या आदिती चौगुलेचे पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परीक्षेत यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 16:14 IST2024-04-17T16:14:40+5:302024-04-17T16:14:57+5:30
जयसिंगपूर : येथील आदिती संजय चौगुले हिने देशभरात ४३३ वी रँक घेवून युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे. ...

Kolhapur: जयसिंगपुरच्या आदिती चौगुलेचे पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परीक्षेत यश
जयसिंगपूर : येथील आदिती संजय चौगुले हिने देशभरात ४३३ वी रँक घेवून युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे. पहिल्याच प्रयत्नात वयाच्या २६ व्या वर्षी तिने हे यश संपादन केले.
आदितीचे दहावीपर्यंत शिक्षण मालू हायस्कूल, बारावी जनतारा शिक्षण संकुल जयसिंगपूर तर वालचंद कॉलेज सांगली येथे तिने स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी घेतली. समाजशास्त्र विषयात उत्तीर्ण होवून युपीएससी परीक्षेची तयारी तिने सुरु केली होती. केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या नागरी (मुख्य) परीक्षा २०२३ निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये तिने ४३३ वी रँक घेवून यश संपादन केले.
तिचे वडील श्री दत्त साखर कारखाना शिरोळ येथे उपअभियंता पदावर कार्यरत असून आई गृहिणी आहे. यशाबद्दल आदिती म्हणाली, स्वयंम अध्ययनातून मला हे यश मिळाले आहे. जिद्द व मेहनतीने अभ्यास केला तर कोणतेही क्षेत्र अवघड नाही. मेहनतीचे जोरावर तिने यश मिळविले असल्याचे सांगितले.