कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठीच्या प्रारूप मतदार यादीतील घोळ संपता संपत नसताना आता शहरातील तब्बल १९ हजार २८४ मतदारांचा पत्ताच सापडत नसल्याची धक्कादायक माहिती समाेर आली आहे. आता नेमके हे मतदार कुठले, हे शोधण्याचे नवे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.महापालिका निवडणुकीसाठीची ४ लाख ९४ हजार ७११ इतके मतदार आहेत. यापैकी १९ हजार २८४ मतदारांचा घरचा पत्ता मिळत नाही. त्यामुळे हे मतदार या यादी आले कसे, असा सवाल उपस्थित होत आहे. आधीच महापालिकेच्या मतदार यादीत ३२ हजार २५० इतके दुबार मतदार असल्याचे सिद्ध झाल्याने आता आणखी एक नवा गोंधळ निर्माण झाला आहे. त्यातच या १९ हजार मतदारांचा पत्ता मिळत नसल्याने हे मतदार आले कुठून, त्यांची नोंदणी कोणी केली, ते बोगस तर नाहीत ना? अशा एक ना अनेक शंका-कुशंका उपस्थित होऊ लागल्या आहेत.दुबार मतदारांचे आव्हानप्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर यामध्ये जवळपास ३२ हजार २५० इतके दुबार मतदार असल्याचे समोर आले. यांची नावे पडताळून दुबार मतदारांची कोणत्याही एका ठिकाणाहून नावे कमी करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.बदलीमुळेही पत्ते मिळण्यास अडचणमतदारांच्या मतदान कार्डवरील घराचे पत्ते मिळत नसल्याने प्रशासनामध्येही संभ्रमावस्था आहे. हे मतदार बोगस आहेत की पूर्वी त्यांचे शहरात मतदान होते; पण आता हे कामासाठी, नोकरीच्या बदलीमुळे इतर शहरात गेले आहेत, याचा शोध घ्यावा लागणार आहे.
Web Summary : Kolhapur's municipal election faces turmoil as 19,000 voter addresses are untraceable. This adds to the existing issue of 32,250 duplicate voters, raising concerns about fraudulent registrations and demanding immediate administrative action to verify voter authenticity amidst potential relocation issues.
Web Summary : कोल्हापुर नगर निगम चुनाव में उथल-पुथल, 19,000 मतदाता पते अप्राप्य। इससे 32,250 दोहरे मतदाताओं का मौजूदा मुद्दा बढ़ गया है, जिससे धोखाधड़ी पंजीकरण के बारे में चिंताएं बढ़ रही हैं और संभावित स्थानांतरण मुद्दों के बीच मतदाता प्रामाणिकता को सत्यापित करने के लिए तत्काल प्रशासनिक कार्रवाई की मांग की जा रही है।