शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळ्यावरील बंगल्यात अभिनेत्री संध्या यांचे अनेक वर्षे वास्तव्य, पिंजरा, दो आंखे बारह हाथच्या चित्रीकरणाच्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 17:19 IST

कसबा बावडा येथील गोळीबार मैदान येथे जॉकी खाडे यांच्या शेतात दो आंखे बारह हाथ चित्रपटाचे शूटिंग झाले होते. १९५९ मधील नवरंग चित्रपटातील संध्या यांच्यावर चित्रीत केलेले 'अरे जा रे हट नटखट' या गाण्याचा काही भाग पन्हाळ्यावरील या बंगल्यात चित्रीत झाला होता...

संदीप आडनाईक -कोल्हापूर : अभिनेत्री संध्या यांच्या निधनाने कोल्हापुरात त्यांच्या वास्तव्याच्या आणि पिंजरा, दो आंखे बारह हाथ यासारख्या गाजलेल्या चित्रपटांच्या चित्रीकरणाच्या आठवणींना उजाळा मिळाला. पन्हाळ्यावरील बंगल्यात व्ही. शांताराम यांच्यासह संध्या यांचे अनेक वर्षे वास्तव्य होते. कसबा बावडा येथील गोळीबार मैदान येथे जॉकी खाडे यांच्या शेतात दो आंखे बारह हाथ चित्रपटाचे शूटिंग झाले होते. १९५९ मधील नवरंग चित्रपटातील संध्या यांच्यावर चित्रीत केलेले 'अरे जा रे हट नटखट' या गाण्याचा काही भाग पन्हाळ्यावरील या बंगल्यात चित्रीत झाला होता.

कोल्हापुरातील पोस्टर आर्टिस्ट कलायोगी जी. कांबळे यांनी झनक झनक पायल बाजे या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चित्रपटगृहाच्या समोर फिरत्या ड्रमवरील संध्याचा नृत्याविष्कार, स्त्री चित्रपटातील घोड्यावरून पळवून नेतानाचे संध्या यांचे काळ्या बुरख्यातून दिसणारे पारदर्शक सौंदर्य, दो आंखे बारह हाथ चित्रपटांतील संध्या यांचे हातात वाद्य घेतलेले ३५० फुटाचे त्यांचे भव्य पोस्टर मुंबईच्या ऑपेरा हाउसवर झळकलेले होते. काेल्हापुरातील स्टुडिओत हे पोस्टर तयार केले तेव्हा स्वत: संध्या ते पाहून आश्चर्यचकित झाल्या होत्या, अशी आठवण त्यांचे चिरंजीव अशोक कांबळे यांनी सांगितली.

खेबूडकरांना पुरणपोळी घातली खायला -पिंजरा चित्रपटाच्या गाण्यांसाठी कवी जगदीश खेबूडकर जेव्हा मुंबईतील शांताराम यांच्या रामविलास बंगल्यात पाच वर्षे मुक्कामी होते, तेव्हा दसरा, अक्षय तृतीयेला संध्या स्वत:च्या हाताने पुरणपोळी बनवून त्यांना खायला घालत, अशी आठवण खेबूडकरांच्या कन्या अंगाई यांनी सांगितली. पिंजरा चित्रपटात नाच्याची भूमिका करणारे मास्टर आबू यांनी संध्या यांच्यासोबतच्या अनेक आठवणी ऐकल्याचे त्यांचे चिरंजीव अस्लम वंटमुरीकर यांनी सांगितले. नाच्याच्या भूमिकेसाठी मेकअप केल्यावर ते आपल्यापेक्षा अधिक गोरे आणि देखणे दिसत, असे कौतुक संध्या यांनी केल्याची आठवण अस्लम यांनी ऐकवली.

English
हिंदी सारांश
Web Title : Actress Sandhya's Panhala bungalow stay, memories of 'Pinjra' filming.

Web Summary : Actress Sandhya's death revives memories of her Panhala bungalow stay and film shoots like 'Pinjra'. She shared close bonds with colleagues, personally caring for them. Her impactful film posters amazed her.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरbollywoodबॉलिवूड