शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

कारवाई ठाण्यात, आनंद कोल्हापूरात

By admin | Updated: December 27, 2014 00:48 IST

लाच घेताना ‘बाबा’ जाळ्यात : सहीचे अलिखित दरपत्रकच

कोल्हापूर : एम. फिल., पीएच. डी.ची वेतनवाढ, मेडिकलची बिले अथवा अन्य कोणतेही काम असेल तर त्यासाठी दरपत्रकच लावलेल्या व कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयात पुर्वी काम केलल्या एका माजी अधिकाऱ्यास अटक झाल्याने येथील प्राध्यापकांनी आनंद व्यक्त केला. या अधिकाऱ्यास काल, गुरुवारी ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने वेतननिश्चितीसाठी वीस हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्याचे वृत्त समजताच शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्राध्यापकांनी समाधान व्यक्त केले.विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालय येथील काही अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कारभारामुळे नेहमीच चर्चेत आहे. पारदर्शक कामकाज होत नसल्याने प्राध्यापक, प्राचार्य संघटनांकडून वारंवार याठिकाणी आंदोलने होतात. गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वी याठिकाणी कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्याने काम करण्याचे अलिखित दरपत्रकच तयार केले होते. एम. फिल., पीएच. डी.ची वेतनवाढ, मेडिकलची बिले, सेवानिवृत्तीनंतरचा फंड, स्थाननिश्चिती अशा प्रत्येक कामासाठी विशेष स्वरूपातील ‘अर्थ’ पूर्ण व्यवहार झाल्याशिवाय प्राध्यापक, प्राचार्यांची ‘फाईल’ पुढे सरकतच नव्हती, असे अनुभव काही प्राध्यापकांनी स्वत:हून फोन करून सांगितले. सेवानिवृत्त झालेल्या पण, फंड, आदी लाभांसाठी तसेच नव्याने रुजू होऊन वेतन सुरू होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या प्राध्यापकांच्या मदतीवर संबंधित अधिकाऱ्याने लग्नाचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केल्याचे काही प्राध्यापकांनी सांगितले. त्यांच्या कारभाराचा त्रास वाढल्याने त्याला हटविण्यासाठी विद्यापीठ शिक्षक संघ आणि प्राचार्य संघटनेने आंदोलनाची मोट बांधली. त्याला बळी पडण्याआधीच त्यांनी येथून बदली करून घेतली होती.किती ही हाव...ज्यांना लाच घेताना पकडले, त्यांची पत्नीही कोल्हापुरातील महाविद्यालयात प्राध्यापिका आहेत. असे असतानाही पैसे मिळाल्याशिवाय सहीसाठी ते पेनच उचलत नव्हते असे प्राध्यापकांनी सांगितले.