शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
3
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
4
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
5
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
6
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
7
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
8
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
9
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
10
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
11
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
12
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
13
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
14
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
15
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
16
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
17
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
18
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
19
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
20
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
Daily Top 2Weekly Top 5

बदल्यांसाठी बोगस प्रमाणपत्रे, १७ शिक्षकांवर गंडांतराची शक्यता; कोल्हापूर जिल्हा परिषदेला अहवाल सादर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 12:42 IST

उर्वरित सर्वच प्रमाणपत्रे योग्य असल्यानेही संशय वाढला

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या ३५६ शिक्षकांनी बदल्यांसाठी विविध प्रमाणपत्रे जोडली असून, त्यातील १७ शिक्षक पडताळणीसाठी मुदतवाढ दिल्यानंतरही ‘सीपीआर’कडे फिरकलेच नसल्याने ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. याबाबतचा अहवाल ‘सीपीआर’कडून जिल्हा परिषदेला सादर करण्यात आला आहे. याबाबत आज मंगळवारी किंवा बुधवारी पुढील कार्यवाही होण्याची शक्यता आहे.या सर्व शिक्षकांची फेरपडताळणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात ५४ जणांनी या प्रक्रियेकडे पाठ फिरवली होती. या सर्वांना पडताळणीसाठी २९ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. तरीही यातील १७ जण पडताळणीसाठी ‘सीपीआर’कडे गेले नसल्याने त्यांच्या प्रमाणपत्रांबाबत अहवालात अनुपस्थित असा उल्लेख करण्यात आला आहे.या सर्व शिक्षकांनी संवर्ग १ मधील तरतुदीनुसार बदल्या करून घेतल्या; परंतु राज्यातून बदल्यांसाठी बोगस प्रमाणपत्रे घेतल्याच्या तक्रारी प्रमाणाबाहेर आल्याने दिव्यांग किंवा आजारी असलेल्या शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी जिल्ह्यातील ३५६ शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे काम ‘सीपीआर’कडे सोपवले.या प्रक्रियेला १७ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली ३५६ पैकी ५४ शिक्षकांनी त्यांची कागदपत्रेच जमा केलेली नाहीत. या ५४ मधील २१ जण तपासणीसाठी ‘सीपीआर’कडे फिरकलेच नाहीत. तर ३३ जण येऊन गेले; पण त्यांनी आपल्याकडील कागदपत्रेच दिली नाहीत. त्यामुळे या ५४ जणांच्या पडताळणीसाठी २९ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. यातील १७ जणांनी तिकडे जाणेच टाळल्याने त्यांच्याभोवतीचे संशयाचे धुके आणखी गडद झाले आहे.

निलंबन शक्यजर या १७ जणांनी वस्तुस्थितिदर्शक प्रमाणपत्रे घेतली असतील तर हे सर्वजण पडताळणीसाठी मुदतवाढ देऊनही का गेले नाहीत असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे जर ही प्रमाणपत्रे खोटी किंवा बोगस, चुकीची निघाली तर या सर्वांचे निलंबन अटळ मानले जाते.उर्वरित सर्व पात्र कसे?३५६ शिक्षकांपैकी केवळ १७ जण संशयाच्या भोवऱ्यात असले, तरी ही संख्या अधिक असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, ‘सीपीआर’मधून एकदा दिलेली प्रमाणपत्रे ‘सीपीआर’चे डॉक्टर पडताळणीत चूक कसे म्हणणार. त्यांनी जर चूक म्हटले तर ते देखील कारवाईस पात्र ठरणार आहेत. त्यामुळे उर्वरित सर्व प्रमाणपत्रे योग्य असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे; परंतु त्रयस्थ यंत्रणेकडून या प्रमाणपत्रांची तपासणी करण्याची गरजही व्यक्त होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Fake certificates for transfers: Trouble for 17 teachers in Kolhapur.

Web Summary : Seventeen Kolhapur teachers face suspension for failing to verify transfer certificates. An inquiry revealed discrepancies in 356 teachers' documents, raising concerns about fraudulent practices and prompting calls for further impartial investigation.