Action against a private lab for dumping organic waste | जैविक कचरा टाकल्याप्रकरणी खासगी लॅबवर कारवाई

कोल्हापूरातील निवृत्ती चौक येथील नेताजी तरूण मंडळाच्या परिसरात टाकण्यात आलेल्या जैविक कचऱ्याबद्दल संबधित डॉक्टरास परिसरातील नागरीकांना चांगलेच धारेवर धरले. (छाया : सचिन भोसले )

ठळक मुद्देनिवृत्ती चौकातील प्रकार परिसरातील नागरीकांनी संबधित डॉक्टरला धरले धारेवर

कोल्हापूर : खासगी लॅबमधून तपासून झालेला जैविक कचरा टाकल्याप्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने महाद्वार रोडवरील साई पॅतोलॉजी लॅबवर कारवाई करीत पाच हजारांचा दंड वसुल केला. हा प्रकार शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकातील नेताजी तरूण मंडळाजवळ घडला. वाढत्या कौरोनााच्या पार्श्वभूमीवर जागरूक नागरीकांनी संबधित डॉक्टर व महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते.

गुरूवारी सकाळी शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकातील नेताजी तरूण मंडळच्या शेडजवळील एका बाजूस खासगी लॅबमधून तपासून झालेला जैविक कचरा टाकण्यात आला होता. ही बाब परिसरातील नागरीकांनी प्रथम नगरसेवक अजित ठाणेकर यांना फोनवरून

कळविली. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी तत्काळ हजर झाले. त्यांनी कचरा टाकलेल्या ठिकाणाची पाहणी केली असता हा जैविक कचरा महाद्वार रोडवरील श्री साई पॅथोलॉजी लॅबचा असल्याचे पुढे आले. त्यांनी संबधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले. त्यांनीही हा कचरा बायो वेस्ट जमा करणाऱ्या कंपनीकडे दिला होता. तो आम्ही येथे टाकला नसल्याचे सांगितले. त्यावर परिसरातील नागरीकांनी संबधित डॉक्टर व त्यांच्या कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

यापुर्वीही असा प्रकार या परिसरात घडला असून या लॅबवर कडक कारवाई करावी. अशी मागणी केली. त्यानंतर संबधित डॉक्टरने असा प्रकार पुन्हा होणार नाही अशी हमी दिली. महापालिका आरोग्य विभागाने संबधित डॉक्टरांकडून योग्यरित्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट न लावल्याबद्दल पाच हजाराचा दंड वसुल केला. त्यानंतर येथील वातावरण निवळले.


 

Web Title: Action against a private lab for dumping organic waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.