शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: अपहार कबूल करायला लावण्यासाठी लेखाधिकाऱ्याचे अपहरण करून मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 15:43 IST

आठ जणांना अटक : धाक दाखवण्यासाठी कोयत्याचा वापर

कोल्हापूर : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील शालेय पोषण आहारचे लेखाधिकारी दीपक बाळासाहेब माने (वय: ४४, रा. रॉयल इनफिल्ड अपार्टमेंट, नागाळा पार्क, कोल्हापूर) यांचे स्वयंपाक व मदतनीस यांच्या मानधन निधीतील २३ लाखांचा अपहार तूच केल्याचे कबूल कर, असे म्हणत बुधवारी आठ जणांनी अपहरण करून त्यांना कोयत्याच्या मुठीने मारहाण केली. टेंबलाई मंदिर परिसरातील मणेरमळा मैदानात ही घटना घडली.

याप्रकरणी इंद्रजित मारुती साठे (३८, रा. विनोद चौगुलेनगर, कळंबा, ता. करवीर), संग्राम दिनकर जाधव ( ४२, रा. शुक्रवार पेठ, कोल्हापूर), उत्तम आनंदा भोसले ( ३०, रा. पाटपन्हाळा, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर), प्रकाश मेहपती मिसाळ (३२, रा. मिसाळवाडी, ता. राधानगरी), संदीप मधुकर ठमके ( ४०, रा. जुना बुधवार पेठ, कोल्हापूर), महादेव कृष्णा मेथे (४६, रा. रामानंदनगर, कोल्हापूर), मंगेश तुकाराम जाधव ( ४२, रा. कुंभार गल्ली, पापाची तिकटी, कोल्हापूर), प्रसाद संजय आमले ( वय : ३१, रा. बागलचौक, कोल्हापूर) यांना राजाराम पोलिस ठाण्यातील पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून कोयता आणि तवेरा कार जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आरोपीतील संदीप ठमके हे प्राथमिक शिक्षण विभागात कनिष्ठ लिपिक आहे. इंद्रजित साठे यांच्या पत्नी डाटा ऑपरेटर म्हणून आहेत.पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी दीपक माने आणि संशयित आरोपी इंद्रजित साठे यांच्या पत्नी आणि संदीप हे प्राथमिक शिक्षण विभागातच काम करतात. त्यामुळे ते एकमेकांच्या ओळखीचे आहेत. दरम्यान, बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता अधिकारी माने हे कमला कॉलेज येथे लोकसभा निवडणुकीच्या कामावर होते. त्यावेळी संशयित आरोपी इंद्रजित आणि त्यांच्या सात साथीदारांनी माने यांना बाहेर बोलावून घेतले. मानधन निधी वाटप अपहारासंंबंधी चर्चा करायची आहे, असे त्यांना सांगितले.चर्चा करत असताना माने यांना आरोपींनी बळजबरीने उचलून आपल्याकडील तवेरा कारमध्ये बसवून घेऊन टेंबलाई मंदिर परिसरात घेऊन गेले. सर्व आरोपींनी संगनमत करून माने यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. वाईट भाषेत शिवीगाळ केली. स्वयंपाक मदतनीस यांचे मानधन निधीची २३ लाख रकमेचा अपहार तूच केलेला आहे, असे कबूल कर आणि ही रक्कम तूच भर व वरून आम्हास १० लाख रुपये दे, नाही तर तुझ्यावर विनयभंगाची केस करतो, असे असे म्हणून मोबाईल शूटिंग करून मारहाण केली. यावेळी इंद्रजित साळे यांनी हातातील कोयत्याच्या मुठीने मारहाण केली.जि. प. तील भ्रष्टाचार चव्हाट्यावरअधिकाऱ्याला अपहरण आणि मारहाण प्रकरणातील जिल्हा परिषदेतील तब्बल २३ लाखांचा अपहार चव्हाट्यावर आला आहे. परिणामी जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचारालाही यानिमित्ताने वाचा फुटली आहे. हे प्रकरण पोलिसात दाखल होऊ नये म्हणून काहीजण तडजोड करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, फिर्यादी ठाम राहिल्याने याची नोंद रात्री उशिरा पोलिसांत झाली.

दहा लाख कमिशन ?२३ लाख अपहाराची रक्कम भरून दहा लाख देण्याची मागणी आरोपींनी माने यांच्याकडे केली. दहा लाख रुपये कमिशनसाठी मागणी केल्याची चर्चा होती. परिणामी जिल्हा परिषदेत कमिशनराजही फोफावल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीzpजिल्हा परिषदPoliceपोलिस