पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 19:27 IST2021-03-05T19:26:53+5:302021-03-05T19:27:40+5:30
Accident Kolhapur- पाटबंधारे विभागातील कालवा निरीक्षक राहुलराज अनिल पाटील (३२, रा. शिरोली पुलाची) यांचा शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता अपघाती मृत्यू झाला. कोल्हापूर- रत्नागिरी मार्गावरील रेडेडोह येथे मारुती कार आणि मालवाहतूक करणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक झाली. या धडकेत कारमधील राहुल पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.

पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू
ठळक मुद्देपाटबंधारे विभागातील अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यूकार आणि मालवाहतूक करणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक
कोल्हापूर : पाटबंधारे विभागातील कालवा निरीक्षक राहुलराज अनिल पाटील (३२, रा. शिरोली पुलाची) यांचा शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता अपघाती मृत्यू झाला. कोल्हापूर- रत्नागिरी मार्गावरील रेडेडोह येथे मारुती कार आणि मालवाहतूक करणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक झाली. या धडकेत कारमधील राहुल पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.
राहुल पाटील हे कार्यालयीन कामासाठी कारमधून पन्हाळाकडे जात होते. समोरून भरधाव आलेल्या मालवाहतूक ट्रकची धडक झाली. या धडकेत राहुल गंभीर जखमी झाले. सीपीआरमध्ये उपचारासाठी आणले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.