कोल्हापुरातील सायबर चौकात भीषण अपघात; भरधाव कारच्या धडकेत तिघे ठार, चारजण जखमी -video
By उद्धव गोडसे | Updated: June 3, 2024 15:47 IST2024-06-03T15:47:11+5:302024-06-03T15:47:47+5:30
कोल्हापूर : कोल्हापुरातील सायबर चौकात भीषण अपघात झाला. भरधाव कारने चार वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात कार चालकासह ...

कोल्हापुरातील सायबर चौकात भीषण अपघात; भरधाव कारच्या धडकेत तिघे ठार, चारजण जखमी -video
कोल्हापूर : कोल्हापुरातील सायबर चौकात भीषण अपघात झाला. भरधाव कारने चार वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात कार चालकासह तिघे ठार झाले. तर चार जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये भरधाव कारने पाठिमागून समोरील वाहनांना जोराची धडक दिली. तर पुढे जात कार उलटली. अपघातानंतर चौकात एकच खळबळ उडाली.