भूपाल शेटे-संजय भोसले यांच्यात शिवीगाळ; कोल्हापूर महापालिका जनसंपर्क कार्यालयात घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 12:54 IST2025-03-11T12:53:46+5:302025-03-11T12:54:06+5:30

कोल्हापूर : माजी उपमहापौर भूपाल शेटे आणि महानगरपालिकेचे निलंबित अधिकारी संजय भोसले यांच्यातील घरफाळा घोटाळ्यावरून सुरू असणारी कायदेशीर लढाई ...

Abuse between former Deputy Mayor Bhupal Shete and suspended Kolhapur Municipal Corporation officer Sanjay Bhosale | भूपाल शेटे-संजय भोसले यांच्यात शिवीगाळ; कोल्हापूर महापालिका जनसंपर्क कार्यालयात घडला प्रकार

भूपाल शेटे-संजय भोसले यांच्यात शिवीगाळ; कोल्हापूर महापालिका जनसंपर्क कार्यालयात घडला प्रकार

कोल्हापूर : माजी उपमहापौर भूपाल शेटे आणि महानगरपालिकेचे निलंबित अधिकारी संजय भोसले यांच्यातील घरफाळा घोटाळ्यावरून सुरू असणारी कायदेशीर लढाई सोमवारी हमरीतुमरीपर्यंत पोहोचली. खुर्चीवर बसण्यावरून या दोघांत तुफान शिवीगाळ झाली. एकमेकांना दमबाजी करण्यामुळे महानगरपालिकेत काही वेळासाठी गोंधळ उडाला.

माजी उपमहापौर शेटे सोमवारी महापालिकेत प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांना निवेदन देण्यासाठी आले होते. निवेदन देऊन ते परतत असताना जनसंपर्क कार्यालयात गेले. तेथे असलेल्या एका खुर्चीत ते बसले. पत्रकारांना निवेदन देत असतानाच त्या ठिकाणी निलंबित अधिकारी संजय भोसले आले. भोसले यांनी शेटे यांना खुर्चीतून उठण्याची सूचना केली. या खुर्चीत भोसले रोज बसत असतात. त्यामुळे शेटे त्या खुर्चीतून उठले, पण उठत असताना हे जनसंपर्क कार्यालय आहे, इथे कोणीही बसू शकतो, येऊ शकतो, असे म्हणताच भोसले यांचा राग अनावर झाला.

भोसले यांनी शेटे यांचा अपमान होईल असे शब्द वापरले. त्यावरून वाद सुरू झाला. शेटे यांनीही त्याला त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले. परंतु, भोसले यांचा पारा भलताच चढला होता, त्यांनी थेट शिवीगाळ सुरू केली. दोघांमधील हा वाद मोठ्या आवाजात सुरू झाल्याने महापालिकेत एकच गोंधळ उडाला. अनेक कर्मचारी जनसंपर्क कार्यालयासमोर गोळा झाले. शेवटी या वादात पत्रकारांनी हस्तक्षेप करत शेटे यांना जनसंपर्क कार्यालयातून बाहेर आणले.

Web Title: Abuse between former Deputy Mayor Bhupal Shete and suspended Kolhapur Municipal Corporation officer Sanjay Bhosale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.