शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: गर्भपाताच्या गोळ्यांचा पुरवठा करणारा सापडला, बंगळुरूतून निकेश बोहरा याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 12:23 IST

कोल्हापूर : गर्भपाताच्या गोळ्यांचा पुरवठा करणारा निकेश कुशल राज बोहरा (वय ४०, रा. बंगळुरू, कर्नाटक) याला करवीर पोलिसांनी दोन ...

कोल्हापूर : गर्भपाताच्या गोळ्यांचा पुरवठा करणारा निकेश कुशल राज बोहरा (वय ४०, रा. बंगळुरू, कर्नाटक) याला करवीर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी अटक केली. त्याने विक्रेत्यांना किती गोळ्यांचा पुरवठा केला याचा तपास सुरू आहे. गर्भलिंग निदान करण्यासाठी सोनोग्राफी मशीन पुरवणाऱ्या संशयितांचाही शोध सुरू असल्याची माहिती करवीर पोलिसांनी दिली.आरोग्य विभागाने कळंबा येथील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये छापा मारून केलेल्या कारवाईत गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाल्यानंतर करवीर पोलिस मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. हॉस्पिटलमध्ये सापडलेल्या गर्भपाताच्या गोळ्यांचा तपास करताना पोलिसांना कर्नाटकातील पुरवठादाराची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बंगळुरू येथे जाऊन निकेश बोहरा याला अटक केली. त्याची राजेश ड्रग्ज ही फर्म असून, त्याद्वारे त्याने कोल्हापुरात अनेक विक्रेत्यांना गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री केल्याची माहिती समोर आली आहे. त्याने आजवर विकलेल्या गोळ्यांची माहिती घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, गुन्ह्यात वापरलेले मोबाइल सोनोग्राफी मशीनही कर्नाटकातून आणल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यानुसार मशीनची विक्री करणाऱ्या संशयितांना अटक करणार असल्याचे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPregnancyप्रेग्नंसीAbortionगर्भपातCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस