शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
IPL 2026: अभिषेक-हेडची वादळी खेळी; क्लासेनचा क्लास! SRH नं घरच्या मैदानावर MI ला दिला पराभवाचा धक्का
4
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
5
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
6
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
7
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
8
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
9
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
10
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
11
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
13
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
14
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
15
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
16
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
17
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
18
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आबा-काका गटांत धुमश्चक्री

By admin | Updated: August 2, 2015 00:12 IST

तासगावात रणकंदन : बाजार समिती मतदानावेळी वाद; पोलीस उपअधीक्षकांसह तिघे जखमी; राष्ट्रवादीचा बूथ उधळला

तासगाव : तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानावेळी शनिवारी दुपारी भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत जोरदार धुमश्चक्री झाली. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. दगडफेक झाली. राष्ट्रवादीचा बूथ उधळून लावला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ताजुद्दीन तांबोळी यांच्या गाडीचा चक्काचूर करण्यात आला. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. या घटनेत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांसह पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे व तीन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले. तासगाव बाजार समितीसाठी शनिवारी मतदान झाले. येथे दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील गट आणि भाजपचे खासदार संजयकाका पाटील गटात वैमनस्य आहे. येथील यशवंत हायस्कूलच्या इमारतीत मतदान केंद्र होते. सकाळी आठला मतदानास सुरुवात झाली. तेथे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांबरोबरच राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील आणि खासदार संजयकाका पाटील स्वत: ठाण मांडून होते. अकरा वाजल्यापासून मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली. तेव्हापासून परिस्थिती तणावसदृश दिसू लागली. पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी दंगल नियंत्रण पथक बोलावून घेतले. दुपारी दोनच्या सुमारास राष्ट्रवादीचे दिनकरदादा पाटील आणि निवास पाटील यांनी हमाल गटातील मतदार मतदान केंद्रावर आणले. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत किरकोळ कारणावरून मतदान केंद्राबाहेरच बाचाबाची झाली. त्यातूनच दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांत जोरदार हाणामारी झाली. राष्ट्रवादीचे दिनकरदादा पाटील, निवास पाटील, संजय पाटील, ताजुद्दीन तांबोळी यांना मारहाण झाली, तर भाजपचे अमित पाटील हेही जखमी झाले. राष्ट्रवादीच्या दिनकरदादा पाटील यांना होणारी मारहाण थांबविताना पोलीस उपअधीक्षक पिंगळे हेही जखमी झाले. कार्यकर्त्यांची पांगापांग करताना तीन पोलीस कर्मचारीही किरकोळ जखमी झाले. दोन्ही गटांत हाणामारी सुरू झाल्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह राखीव पोलीस दलाची एक तुकडी घटनास्थळी हजर झाली. यावेळी पाटील आणि काही कार्यकर्त्यांत बाचाबाची झाली. पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्यानंतर गर्दी पांंगली. मतदान केंद्राला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. तणावपूर्ण परिस्थितीतच सायंकाळी चारपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. (प्रतिनिधी) ताजुद्दीन तांबोळींची गाडी चक्काचूर राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ताजुद्दीन तांबोळी यांची मोटार काही कार्यकर्त्यांनी दगड घालून चक्काचूर केली. त्यांच्या इनोव्हा (एमएच ०९ बीडी २२५५) मोटारीवर दगडफेक करून सर्व बाजूंनी चुराडा केल्याचे चित्र दिसून येत होते. सुमनतार्इंसह कार्यकर्ते पोलीस बंदोबस्तात रवाना मतदान केंद्रावर भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत हाणामारी झाल्यानंतर आमदार सुमनताई पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मतदान केंद्राजवळ असणाऱ्या कार्यालयात थांबले होते. परिस्थिती नियंत्रणाखाली आल्यानंतर माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील, रोहन सुरेश पाटील, राहुलअण्णा पाटील, मेधाताई झांबरे यांना पोलीस बंदोबस्तात अंजनी येथे सोडण्यात आले. मतदान केंद्राजवळच्या राष्ट्रवादीच्या इतर कार्यकर्त्यांनाही पोलीस बंदोबस्तातच हलविण्यात आले. पोलिसांचा कॅमेरा बंद पाडला कार्यकर्त्यांत धुमश्चक्री सुरूझाली, तेव्हा घटनास्थळावर पोलिसांची संख्या अपुरी होती. त्यातच मतदान केंद्राच्या चारही बाजूंनी कार्यकर्ते घुसल्यामुळे पोलीस सर्वच बाजूला विभागले गेले. घटनास्थळाचे चित्रीकरण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना काही कार्यकर्त्यांनीच दमदाटी करून चित्रीकरण बंद करायला भाग पाडले. सुरुवातीला काही काळ परिस्थिती पोलिसांच्या हाताबाहेर होती. पोलिसांच्या तुकड्या दाखल झाल्यानंतर मात्र हुल्लडबाज कार्यकर्ते पसार झाले.