शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
3
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
4
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
5
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
6
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
7
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
8
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
9
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
10
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
11
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
12
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
13
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
14
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
15
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
16
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
17
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
18
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
19
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
20
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

‘आयो रे मारो ढोलना...’

By admin | Updated: October 16, 2015 00:36 IST

रास दांडिया : ‘लोकमत’ व ‘आॅयस्टर जैन्स’च्या वतीने आयोजन; सांचीने आणली रंगत

कोल्हापूर : ‘ढोल तारो ढोल बाजे...’ अशा हिंदीसह गुजराती गीतांच्या तालावर रंगीबेरंगी पारंपरिक वेशभूषेत हातात टिपऱ्या घेऊन गरब्याच्या गीतांवर थिरकणाऱ्या युवक-युवतींनी नवरात्रीतील रास दांडिया कार्यक्रमात बुधवारी रात्री जल्लोष केला. सोबतच्या नेत्रदीपक विद्युत रोषणाईने व ‘बालिका वधू’ मालिकेतील अभिनेत्री सांचीने कार्यक्रमाला वेगळ्या उंचीवर नेले. निमित्त होेते, ‘लोकमत’ व ‘आॅयस्टर जैन्स’च्या वतीने आयोजित ‘रास दांडिया’चे. शाहू मार्केट यार्ड येथील मुस्कान लॉन येथे नवरात्रीचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी राहुल राठोड, धैर्यशील माने, कपिल ओसवाल, कुंदन ओसवाल, भावेश ओसवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दुर्गामातेची आरती करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. रात्री दहाच्या सुमारास अभिनेत्री सांची यांचे कार्यक्रमस्थळी आगमन होताच उपस्थितांनी एकच जल्लोष करून त्यांचे स्वागत केले. त्यांनीही हातात टिपरी घेऊन गरबा व दांडिया नृत्य केले. त्यामुळे स्पर्धकांतही उत्साह निर्माण झाला. यानंतर कपल राउंड, दांडिया राउंड व फायनल राउंड झाले. रास दांडिया कार्यक्रमात राजस्थानी व गुजराती पारंपरिक वेशभूषेतील दोनशेहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. ‘डान्स इंडिया डान्स’शोचे ‘सर्वोत्कृष्ट डान्सर’ कुणाल फडके यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती. मोनिका करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले. ओसवाल ज्वेलर्स हे कार्यक्रमाचे प्रमुख प्रायोजक होते, तर महेंद्र ज्वेलर्स, हॉटेल अयोध्या, आय लेव्हल अ‍ॅडव्हर्टायझिंग, एस. पी. एन. न्यूज यांचे याला सहकार्य लाभले होते.कार्यक्रमास आमदार डॉ. सुजित मिणचेकर, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, प्रतिमा पाटील यांनी भेट दिली. आॅयस्टर जैन्स ग्रुपचे अतीश ओसवाल, वैभव ओसवाल, भूषण ठकर, सिद्धार्थ जैन, नूपल सुराणा, आदींसह मोठ्या प्रमाणात ‘लोकमत सखी मंच’ सदस्या व नागरिक उपस्थित होते. स्पर्धेचा निकाल असा -बेस्ट ग्रुप : रंगिलो ग्रुप, बेस्ट ड्रेस : मेल - जीवन ओसवाल. बेस्ट ड्रेस : फिमेल - निकिता नोतानी, बेस्ट गरबा : मेल - अतीश ओसवाल. बेस्ट गरबा : फिमेल - सोनिया राठोड, बेस्ट दांडिया : मेल - हितेश जैन, बेस्ट दांडिया फिमेल : भूमी शहा, बेस्ट दांडिया : मेल : अमर संघवी, बेस्ट कपल : फिमेल - भाग्यश्री ओसवाल.