शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: होडयाच्या शर्यतीतील वाद, हाणामारीत जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 13:26 IST

दत्ता बिडकर हातकणंगले : होडयाच्या शर्यतीवेळी दोन समाजातील युवकामध्ये झालेल्या हाणामारीत जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सचिन बाबासो ...

दत्ता बिडकरहातकणंगले : होडयाच्या शर्यतीवेळी दोन समाजातील युवकामध्ये झालेल्या हाणामारीत जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सचिन बाबासो कांबळे (रा. रुई) असे मृत युवकाचे नाव आहे. सचिनच्या मृत्यूनंतर गावात तणाव निर्माण झाला आहे. याप्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, रुई ता. हातकणंगले येथे सप्टेबर २०२३ मध्ये होडयाच्या शर्यतीवेळी बौद्ध समाज आणि मातंग समाजाच्या युवकामध्ये हाणामारी झाली होती. हा विषय मिटवण्यासाठी गेलेल्या दोन्ही समाजाच्या युवकामध्ये रुई, साठेनगर येथे काल, शुक्रवारी रात्री पुन्हा हाणामारी झाली. यामध्ये सचिन कांबळे सह तीन ते चार युवक गंभीर जखमी झाले होते. जखमीवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, आज, शनिवारी पहाटे उपचारादरम्यान सचिन कांबळे याचा मूत्यू झाला. या घटनेने गावात तणाव निर्माण झाला आहे. संशयितांना अटक केल्याशिवाय सचिनचा मृतदेह ताब्यात घेण्यास बौद्ध समाजाने नकार दिल्याने दोन्ही वसाहतीमध्ये पोलिसाचे जलद कृती दल पाचारण करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून मातंग समाजातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. याबाबत हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस