शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

Kolhapur: पोलिस निरीक्षकांकडून युवकाला बेदम मारहाण, आई बेशुद्ध; व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 17:57 IST

शहापूर पोलिस निरीक्षकाचा कारनामा

इचलकरंजी : प्रेमप्रकरणातून शहापूर पोलिस ठाण्यात हजर झालेल्या युवक, युवतीपैकी युवकाला पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी बेदम मारहाण केली. ते पाहून युवकाची आई बेशुद्ध पडली. त्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. हा प्रकार शनिवारी (दि.१७) रात्रीच्या सुमारास घडला. याप्रकरणाचा व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच शहरात उलटसुलट चर्चेला ऊत आला होता. शहापुरातील एक युवक पुण्यात शिक्षणासाठी वास्तव्यास होता. त्यावेळी एका युवतीसोबत त्याचे सूत जुळले. युवक गावी आल्यानंतर ती युवतीही आली. विवाह झाला नसल्याने संबंधित युवकाने तिला घेऊन पोलिसांना कल्पना देण्यासाठी शहापूर पोलिस ठाणे गाठले. पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी युवक आणि त्याच्या कुटुंबीयाला दिवसभर बसवून ठेवले. तसेच युवतीच्या नातेवाइकांनाही बोलावून घेतले.त्यानंतर दिवसभर कोणतीही घडामोड घडली नाही. अचानक रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास साध्या वेशात अचानक निरीक्षक पोलिस ठाण्यात आले. त्यांनी इतर पोलिस कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले. संबंधित युवकाला आत बोलावून घेऊन चांगला प्रसाद दिला. तो बघून युवकाची आई तिथेच बेशुद्ध पडली. त्या महिलेला उचलण्यासाठी एकही महिला कर्मचारी तिथे उपस्थित नव्हती. युवकानेच उचलून पोलिस गाडीमध्ये आईला ठेवले. त्यावेळी तू गाडीत बसू नकोस, असे म्हणून पोलिस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी युवकाला बाहेर ओढले आणि पुन्हा मारहाण केली. युवकाला ओढल्यामुळे त्यावेळी महिला गाडीतून कोसळली. दुसऱ्या महिलेने उचलून तिला गाडीत घातले व शहापूर येथील मलाबादेनगरजवळील खासगी रुग्णालयात नेले. एका नेत्याच्या मध्यस्थीने या प्रकारावर जरी रात्रीच पडदा टाकला असला, तरी सोशल मीडियातून याची चित्रफीत फिरत असून, या घटनेची उलटसुलट चर्चा सुरू आहे.

निलंबित पोलिस कर्मचारी रुग्णालयातबेशुद्ध पडलेल्या महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी महिला पोहोचण्याअगोदरच दोन दिवसांपूर्वी निलंबित केलेला पोलिस कर्मचारी असिफ कलायगार हा रुग्णालयात उपस्थित होता. तो तेथे का उपस्थित होता आणि त्याने कोणती भूमिका पार पाडली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

संबंधित युवती आणि युवक पोलिस ठाण्यात हजर झाले. ही युवती बेपत्ता असल्याची नोंद नांदेड सिटी पोलिस ठाण्यात आहे. युवकाने दहा-बारा लोकांचे टोळके पोलिस ठाण्यासमोर गोळा करून दंगा चालू केला. त्यांना प्रसाद देताना ते पाहून महिला बेशुद्ध पडली. तिच्यावर रितसर रुग्णालयात उपचार करण्यात आले. तसेच दहा-पंधरा लोकांचे यासंदर्भात जबाबही घेण्यात आले. संबंधित युवतीला तिच्या नातेवाइकांकडे पाठविण्यात आले. -सचिन सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक शहापूर पोलिस ठाणे

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस