शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: शाळेत स्नेहसंमेलनावेळी झाला वाद, युवकाचा धारदार शस्त्राने खून; एक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 16:07 IST

पाचजण ताब्यात; तिघे अल्पवयीन

इचलकरंजी : स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेल्यानंतर झालेल्या वादावादीतून युवकाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. प्रसाद संजय डिंगने (वय १७) असे त्याचे नाव आहे. या घटनेत सौरभ शहाजी पाटील (वय २२, दोघे रा. जवाहरनगर, गणपती कट्ट्याजवळ) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला सांगलीतील सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना रात्री साडेनऊच्या दरम्यान कबनूर हायस्कूल परिसरात घडली. घटनेमुळे जवाहर नगर आणि कबनूर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी पाचजणांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये तीन अल्पवयीन आहेत.पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, प्रसाद हा अकरावीमध्ये शिक्षण घेत आहे. तो आपल्या मित्रांसोबत कबनूर हायस्कूल येथे स्नेहसंमेलन पाहण्यासाठी गेला होता. त्यादरम्यान काही तरुणांसोबत प्रसादचा वाद झाला. डोंब्या, गोंड्या, शिवराज आदी टोपण नावाने परिचित असलेल्या तीन ते पाच तरुणांनी चाकूने प्रसाद याच्यावर वार केले. यात त्याच्या बरगडीत चाकूचा वर्मी घाव बसला तसेच हातावर व छातीवर वार बसल्याने तो जागीच ठार झाला. त्याच्या बचावासाठी गेलेला सौरभ याच्या हातावर, कमरेवर, पाठीवर चाकूने वार करण्यात आले. दोघांना युवकांनी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र एक जागीच ठार झाला होता. शाळेच्या आत दोन पोलिस होते. मात्र ही घटना शाळेच्या बाहेर घडल्याने त्यांनाही लवकर समजले नाही. याची माहिती समजल्यानंतर शाळेतील स्नेहसंमेलन तातडीने थांबविण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गर्दीवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.इंदिरा गांधी रुग्णालयात मयत आणि जखमींच्या नातेवाइकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी पाचजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रात्री उशिरापर्यंत माहिती घेण्याचे काम सुरू होते. खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही. पोलिस उप अधीक्षक समीरसिंह साळवे, पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस