शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: गिरोली घाटात तरुणाचे कारमधून केले अपहरण, दुसऱ्याला दरीत ढकलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 11:43 IST

कोडोली : गिरोली घाटातून मोटारसायकलवरून जात असलेल्या अक्षय अनिल कांबळे (वय २८, रा. सादळे मादळे, ता. हातकणंगले) या तरुणास ...

कोडोली : गिरोली घाटातून मोटारसायकलवरून जात असलेल्या अक्षय अनिल कांबळे (वय २८, रा. सादळे मादळे, ता. हातकणंगले) या तरुणास चारचाकी गाडीत जबरदस्तीने घालून अपहरण केले आणि त्याच्या मावस भावास दरीत ढकलून दिले. ही घटना बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास गिरोली घाटातील पोहाळे मार्गावरील पांडव लेणीजवळ घडली. या घटनेची नोंद कोडोली पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.घटनास्थळ व कोडोली पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अक्षय कांबळे व त्याचा मावस भाऊ शुभम संतोष मोरे हे दोघे जण मोटारसायकलवरून कोल्हापूर येथील सोनतळी (ता करवीर) येथे पाहुण्यांकडे जात होते. यावेळी दोघे गिरोली घाटातील पांडव लेणीजवळील वळणावर येताच तेथे थांबलेली चारचाकी गाडी मोटारसायकलच्या आडवी लावून मोटारसायकलवरील शुभम मोरे याला तिघांनी धक्काबुक्की करून रस्त्यावरून घाटात सुमारे २० फूट खोल असलेल्या दरीत ढकलून दिले. अन्य दोघांनी अक्षयला जबरदस्तीने चारचाकी गाडीमध्ये घालून जोतिबाच्या दिशेने पलायन केले. शुभम मोरे याने या घटनेची माहिती पोलिसांना देताच कोडोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व घडलेल्या घटनेची माहिती घेतली.

अक्षयचा शोध घेण्यासाठी घाटातील परिसर पोलिसांनी पिंजून काढला असता त्याचा शोध लागला नाही. अपहरणकर्त्याचा पाठलाग करू नये म्हणून मोटारसायकलची चावी अपहरणकर्ते घेऊन गेले तसेच अक्षयचा सुगाव लागू नये म्हणून त्यांच्या जवळ असलेला मोबाइल फोन घटनास्थळी टाकून देण्यात आला होता. तसेच, चारचाकी गाडीचा नंबर दिसू नये म्हणून नंबर प्लेटला चिकट टेप लावण्यात आला होता. त्यामुळे हे अपहरण पूर्वनियोजत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.अक्षय हा चार वर्षांपासून गोव्यात खासगी व्यवसाय करीत होता. चार दिवसांपूर्वीच तो सादळे मादळे गावी आला होता. या घटनेची माहिती मिळताच शाहूवाडी विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी आप्पासो पवार यांनी कोडोली पोलिस ठाण्यात भेट देऊन घटनेची माहिती घेतली. पुढील तपास सपोनि कैलास कोडक करीत आहेत

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणPoliceपोलिस