शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: चरीतील पाण्यात बुडून मिरजेतील तरुणीचा मृत्यू, देवदर्शनाहून परतताना झाला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 12:35 IST

कुरुंदवाड : खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील कोपेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन परतत असताना महाविद्यालयीन तरुणीचा मोपेडवरील ताबा सुटून रस्त्याच्या कडेला ...

कुरुंदवाड : खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील कोपेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन परतत असताना महाविद्यालयीन तरुणीचा मोपेडवरील ताबा सुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या चरीतील पाण्यात बुडाल्याने जागीच मृत्यू झाला तर एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. इव्हेजनील बाळासाहेब जिरगे (वय २०, रा. लातूर) असे मृत तरुणीचे नाव आहे तर कविता श्रीशैल माळी (वय २४, रा. माडग्याळ, ता. जत, जि. सांगली) गंभीर जखमी असून, तिच्यावर सांगली शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास खिद्रापूर - टाकळी मार्गावरील प्रकाश रायनाडे यांच्या शेताजवळ ही दुर्घटना घडली. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. येथील पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.जिरगे, माळी व अन्य दोन मैत्रिणी मिरज येथील एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असून, मंगळवारी चौघी दोन मोपेड घेऊन खिद्रापूर कोपेश्वर मंदिराचे दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या. जिरगे ही मोपेड चालवत होती. दर्शन घेऊन परतत असताना खिद्रापूर टाकळी मार्गावरील रायनाडे यांच्या शेताजवळ येताच मोपेडवरील ताबा सुटून ती थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या चरीत गेली.पाठीमागील सीटवर बसलेली कविता रस्त्यावर पडून बेशुद्ध पडली होती तर इव्हेजनील ही चरीतील पाण्यात बुडाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. मुलगी चरीत पडल्याचे समजताच काही प्रवाशांनी तिला बाहेर काढले, मात्र तिचा मृत्यू झाला होता. कुरुंदवाड पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून दत्तवाड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. अधिक तपास कुरुंदवाड पोलिस करीत आहेत.

अन् अपघाताची माहिती मिळालीखिद्रापुरातून बाहेर पडताना रस्ता चुकल्याने जिरगे एका मार्गाने तर दुसरी मैत्रीण दुसऱ्या मार्गाने गेली. चुकामूक झाल्याने एका मैत्रिणीने फोन केला असता अपघातस्थळी नागरिकांनी फोन उचलून अपघाताची माहिती अन्य दोन मैत्रिणींना समजली. त्यामुळे नागरिकांनाही अपघातातील मुलींची माहिती समजण्यास मदत झाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmiraj-acमिरजAccidentअपघातDeathमृत्यू