शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: पोलिस बदल्यांसाठी फसवणूक; सांगलीतील तरुणास अटक

By उद्धव गोडसे | Updated: February 11, 2025 12:39 IST

बँक खाती गोठवली, आणखी काही संशयितांची नावे निष्पन्न होणार

कोल्हापूर : हायवे ट्रॅफिक शाखेकडे बदली करून देण्याचे आमिष दाखवून सहा पोलिसांची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात संतोष यशवंत खरात (वय २७, रा. सांगलीवाडी, सांगली) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या मंगळवारी (दि. ११) पहाटे सांगलीवाडीतून अटक केली. या गुन्ह्यात त्याच्या आणखी काही साथीदारांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी त्याची बँक खाती गोठवली असून, आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू आहे.जिल्हा पोलिस दलातील सहा पोलिसांची १३ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल होताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मनोज सबनीस याला अटक केली होती. त्याच्या चौकशीतून सांगलीवाडी येथील संतोष खरात याचे नाव समोर आले. पोलिसांनी मंगळवारी पहाटे त्याच्या घरी छापा टाकून त्याला अटक केली.

गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार सबनीस याने पोलिसांकडून घेतलेले पैसे खरात याच्या बँक खात्यावर पाठवले होते. त्यामुळे पोलिसांनी खरात याची बँक खाती गोठवली आहेत. त्याच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले.दरम्यान, या गुन्ह्यात आणखी काही संशयिताचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. अटकेतील सबनीस आणि खरात यांच्या चौकशीतून गुन्ह्याची व्याप्ती स्पष्ट होणार आहे. कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातील रॅकेटचा उलगडा होऊ शकतो.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीSangliसांगलीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी