Kolhapur: अब्दुललाटमधील तरुणाने सायकलने गाठली अयोध्या, १७ दिवसांत २००० किलोमीटरचा प्रवास पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 19:22 IST2024-01-19T19:21:11+5:302024-01-19T19:22:09+5:30
अब्दुललाट : अयोध्या येथे होणाºया रामलल्ला प्राणप्रतिष्ठेला हजर राहण्यासाठी येथील मानस बिंदगे या तरुणाने सायकलने अयोध्या गाठली. १ जानेवारीला ...

Kolhapur: अब्दुललाटमधील तरुणाने सायकलने गाठली अयोध्या, १७ दिवसांत २००० किलोमीटरचा प्रवास पूर्ण
अब्दुललाट : अयोध्या येथे होणाºया रामलल्ला प्राणप्रतिष्ठेला हजर राहण्यासाठी येथील मानस बिंदगे या तरुणाने सायकलने अयोध्या गाठली. १ जानेवारीला त्याने हा निश्चय केला. कोणताही गाजावाजा न करता तो निघाला. त्यासाठी त्याने नवी कोरी सायकलही घेतली.
देशभरातील वातावरण आता ‘राममय’ व्हायला सुरवात झाली आहे. कधी त्या दिव्य सोहळ्याचा अनुभव घेतो? कधी प्रभू रामचंद्रांना मंदिरात विराजमान झालेले पाहतो, अशी उत्सुकता प्रत्येक हिंदूंच्या मनात दाटून आली आहे. या घटनेचा साक्षीदार होण्यासाठी मानस याने जयसिंगपूरहून सुरवात करून सांगोला, तुळजापूर, नांदेड, रामटेक,जबलपूर,कटनी महैर, रीवा, प्रयागराज, वाराणसी, जौनपुर व अयोध्या येथेपर्यंत त्याचा सायकलने प्रवास केला आहे.
१७ दिवसांत त्याने सुमारे २००० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. त्याला मध्यप्रदेश व उत्तरप्रदेश या राज्यांतील नागरिकांचे सहकार्य मिळाले. त्याच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधला असता तो म्हणाला, अयोध्येच्या या कार्यक्रमाला जाण्याचा मी संकल्प केला होता. तो पूर्ण झाल्याचा आनंद होत आहे.