माऊली बघत होती मुलाची वाट, मात्र घराच्या माळ्यावरच.., कोल्हापुरातील मन हेलावणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 16:54 IST2022-12-23T16:46:57+5:302022-12-23T16:54:52+5:30

उत्कर्षा पोतदार उत्तूर : मुलगा दोन-चार दिवसांनी घरी येत होता, तो का आला नाही?  म्हणून आई त्याचा सर्वत्र शोध ...

A young man committed suicide at home in Mumewadi village of Azra taluka of Kolhapur district | माऊली बघत होती मुलाची वाट, मात्र घराच्या माळ्यावरच.., कोल्हापुरातील मन हेलावणारी घटना

माऊली बघत होती मुलाची वाट, मात्र घराच्या माळ्यावरच.., कोल्हापुरातील मन हेलावणारी घटना

उत्कर्षा पोतदार

उत्तूर : मुलगा दोन-चार दिवसांनी घरी येत होता, तो का आला नाही?  म्हणून आई त्याचा सर्वत्र शोध घेत होती. तो गडहिंग्लज मध्ये एका हॉटेलमध्ये वेटर काम करायचा. आज येईल उद्या येईल या आशेवर माऊली वाट बघत होती. पण घराच्या माळ्यावरच मुलाने आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपवली होती. ही मन सुन्न करुन टाकणारी घटना घडलीय आजरा तालुक्यातील मुमेवाडी गावात. स्वप्निल शिवाजी भिऊंगडे (वय २७) असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

स्वप्निल हा गडहिंग्लज मध्ये एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करायचा. दोन-चार दिवसांनी तो घरी येत होता. मात्र गेल्या चार दिवसांपासून तो घरी आला नाही. त्यामुळे आई गावात, त्याच्या मित्रांकडे, गडहिंग्लजला चौकशी करायला सांगत होती.

दरम्यान, सोमवारी (दि.१९) घरी जेवायला बसल्यावर माळ्यावरून पाण्याचे थेंब व दुर्गंधी यायला लागली. भावाला बोलवून माळ्यावर जाऊन बघायला सांगितले. त्यावेळी माळ्यावरील तुळईला स्वप्निलचा मृतदेह लटकलेला आढळला. आशेने वाट बघत बसलेल्या आपल्या पोटच्या मुलाचा मृतदेह पाहताच आईने हांबरडा फोडला. आईचा हा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. 

वडिलांचे निधन झाल्याने तो आणि आई भाड्याच्या घरात राहत होते. त्याला एक विवाहित बहीण आहे. आत्महत्या करण्यापूर्वी आईने त्याला घरी येत जा, आठ-आठ दिवस येत नाहीस, बोलत नाहीस, तुझी काळजी वाटते असे सांगितले होते.  

या घटनेची नोंद पोलिसात झाली आहे. हेड कॉन्स्टेबल राजेश आंबुलकर पुढील तपास करीत आहेत.

कोरोना काळात बहुमोल मदत 

स्वप्नील सतत मित्रांबरोबर असायचा. कोरोना काळात मुमेवाडीतील कै. मुकुंदराव आपटे फाउंडेशनच्या कोरोना सेंटर मध्ये त्याने कोरोना पेशंटची निस्वार्थ सेवा केली होती. त्याच्या मृत्यूनंतर गावातील मित्रांच्या स्टेटसला त्याचे कौतुक करणारे मेसेज फिरत होते.
 

Web Title: A young man committed suicide at home in Mumewadi village of Azra taluka of Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.