शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ए. वाय. पाटील गटात फूट; गोकुळचे संचालक किसनराव चौगुले यांच्यासह कार्यकर्त्यांचा के. पी. पाटील गटात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 11:17 IST

अमर मगदूम राशिवडे : राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या गटातील खंद्या समर्थकांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसह बिद्रीचे अध्यक्ष, ...

अमर मगदूमराशिवडे : राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या गटातील खंद्या समर्थकांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसह बिद्रीचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांच्या गटात प्रवेश केला. ए. वाय. पाटील यांचे निर्णय रुचत नसल्याने आपण पालकमंत्री हसन मुश्रीफ व के. पी. पाटील यांच्यासोबत काम करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.गोकुळचे विद्यमान संचालक किसनराव चौगुले, शेतकरी संघाचे विद्यमान संचालक अशोकराव चौगले, बिद्रीचे माजी संचालक युवराज वारके, बाजार समितीचे माजी सभापती सर्जेराव पाटील गवशीकर,  माजी सरपंच धनाजी पाटील कोदवडे, माजी जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील राशिवडे, संजयसिंह कलिकते, अशोक पाटील मोहडे, लक्ष्मण पाटील पुंगाव, शिवाजी भाट येळवडे, वसंतराव पाटील, विश्वास पाटील यांच्यासह राधानगरी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला.या निर्णयामुळे राधानगरी तालुक्यातील ए. वाय. पाटील गटात फूट पडली. ए. वाय. पाटील यांच्या गटातील कार्यकर्त्यांनी के. पी. पाटील यांच्या पाठीमागे बळ उभे केल्याने आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत राधानगरी-भुदरगड मतदार संघावर ही त्याचे परिणाम दिसणार असून राष्ट्रवादीचे सत्तेतील कार्यकर्तेही ए. वाय. पाटील यांना राम राम ठोकण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.

मनधरणीसाठी प्रयत्नबिद्रीत झालेल्या दारुण पराभवानंतर ए. वाय. समर्थक कार्यकर्त्यांनी अनेक वेळा के. पी. पाटील गटासोबत जुळवून घेण्यासाठी प्रयत्न केले. मात्र ए. वाय. यांनी आपला हट्ट सोडला नाहीच उलट पारंपारिक विरोधक आमदार प्रकाश आबिटकर गटासोबत हात मिळवणी व भाजपसोबत जाण्याच्या तयारीने अस्वस्थ कार्यकर्त्यांनी ए. वाय. यांची साथ सोडली.

सत्तेतील कार्यकर्ते ए. वाय. सोबतभोगावती कारखान्यात पाच ए. वाय. समर्थक संचालकांना संधी मिळाली आहे. यातील एकाही संचालकाने उघड होत के. पी. पाटील यांना पाठिंबा दिलेला नाही. भोगावती स्वीकृत संचालक पदी आपली वर्णी लागेल या आशेने अनेकांनी आपले पत्ते उघड केलेले नाहीत. तर ए वाय पाटील यांचे विश्वासू सहकारी गोकुळचे विद्यमान संचालक किसनराव चौगुले यांनी आपले नेते ए. वाय. पाटील यांच्या विरोधात उघड बंड केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरK P. Patilके. पी. पाटीलA. Y Patilए. वाय. पाटीलradhanagari-acराधानगरी