Kolhapur: ए. वाय. पाटील गटात फूट; गोकुळचे संचालक किसनराव चौगुले यांच्यासह कार्यकर्त्यांचा के. पी. पाटील गटात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 11:16 AM2024-03-01T11:16:11+5:302024-03-01T11:17:26+5:30

अमर मगदूम राशिवडे : राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या गटातील खंद्या समर्थकांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसह बिद्रीचे अध्यक्ष, ...

A. Y. Patil group's supporters former MLA K. P. Patil group entry | Kolhapur: ए. वाय. पाटील गटात फूट; गोकुळचे संचालक किसनराव चौगुले यांच्यासह कार्यकर्त्यांचा के. पी. पाटील गटात प्रवेश

Kolhapur: ए. वाय. पाटील गटात फूट; गोकुळचे संचालक किसनराव चौगुले यांच्यासह कार्यकर्त्यांचा के. पी. पाटील गटात प्रवेश

अमर मगदूम

राशिवडे : राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या गटातील खंद्या समर्थकांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसह बिद्रीचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांच्या गटात प्रवेश केला. ए. वाय. पाटील यांचे निर्णय रुचत नसल्याने आपण पालकमंत्री हसन मुश्रीफ व के. पी. पाटील यांच्यासोबत काम करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

गोकुळचे विद्यमान संचालक किसनराव चौगुले, शेतकरी संघाचे विद्यमान संचालक अशोकराव चौगले, बिद्रीचे माजी संचालक युवराज वारके, बाजार समितीचे माजी सभापती सर्जेराव पाटील गवशीकर,  माजी सरपंच धनाजी पाटील कोदवडे, माजी जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील राशिवडे, संजयसिंह कलिकते, अशोक पाटील मोहडे, लक्ष्मण पाटील पुंगाव, शिवाजी भाट येळवडे, वसंतराव पाटील, विश्वास पाटील यांच्यासह राधानगरी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयामुळे राधानगरी तालुक्यातील ए. वाय. पाटील गटात फूट पडली. ए. वाय. पाटील यांच्या गटातील कार्यकर्त्यांनी के. पी. पाटील यांच्या पाठीमागे बळ उभे केल्याने आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत राधानगरी-भुदरगड मतदार संघावर ही त्याचे परिणाम दिसणार असून राष्ट्रवादीचे सत्तेतील कार्यकर्तेही ए. वाय. पाटील यांना राम राम ठोकण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.

मनधरणीसाठी प्रयत्न

बिद्रीत झालेल्या दारुण पराभवानंतर ए. वाय. समर्थक कार्यकर्त्यांनी अनेक वेळा के. पी. पाटील गटासोबत जुळवून घेण्यासाठी प्रयत्न केले. मात्र ए. वाय. यांनी आपला हट्ट सोडला नाहीच उलट पारंपारिक विरोधक आमदार प्रकाश आबिटकर गटासोबत हात मिळवणी व भाजपसोबत जाण्याच्या तयारीने अस्वस्थ कार्यकर्त्यांनी ए. वाय. यांची साथ सोडली.

सत्तेतील कार्यकर्ते ए. वाय. सोबत

भोगावती कारखान्यात पाच ए. वाय. समर्थक संचालकांना संधी मिळाली आहे. यातील एकाही संचालकाने उघड होत के. पी. पाटील यांना पाठिंबा दिलेला नाही. भोगावती स्वीकृत संचालक पदी आपली वर्णी लागेल या आशेने अनेकांनी आपले पत्ते उघड केलेले नाहीत. तर ए वाय पाटील यांचे विश्वासू सहकारी गोकुळचे विद्यमान संचालक किसनराव चौगुले यांनी आपले नेते ए. वाय. पाटील यांच्या विरोधात उघड बंड केले आहे.

Web Title: A. Y. Patil group's supporters former MLA K. P. Patil group entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.