शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

आधीचे नव्हतेच काही, आता आईदेखील नाही..; अपघाताने सर्वस्वच हिरावून घेतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 11:49 IST

अपघाताने एका चार वर्षीय बालकाचे सर्वस्वच हिरावून घेतले

कोल्हापूर : पुणे-बंगळुरू महामार्गावर गोकुळ शिरगाव येथे रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा सोमवारी (दि. २८) उपचारादरम्यान सीपीआरमध्ये मृत्यू झाला. अनोळखी आणि बेवारस महिलेचा अपघात गुरुवारी (ता. २४) झाला होता. त्याच अपघातात महिलेचा चार वर्षांचा मुलगा किरकोळ जखमी झाला. अपघातात आईचे छत्र हरवल्यामुळे निष्पाप आणि निरागस बालक पोरके झाले. आधीचे नव्हतेच काही, आता आईदेखील नाही..असे कालवाकालव होणारे आयुष्य त्याच्या वाट्याला आले.युद्धात किंवा दहशतवादी हल्ल्यात दगावणाऱ्या माणसांपेक्षा अपघातांमध्ये दगावणाऱ्या माणसांची संख्या खूपच जास्त आहे. अपघातांमुळे क्षणात चालता-बोलता माणून निघून जातो, तर कधी आयुष्यभरासाठी जायबंद होतो. त्यातून संपूर्ण कुटुंब कोसळते. पुणे-बंगळुरू महामार्गावर गोकुळ शिरगाव येथे गुरुवारी झालेल्या अपघाताने एका चार वर्षीय बालकाचे सर्वस्वच हिरावून घेतले. अंदाजे ३५ ते ४० वर्ष वयोगटातील भटकंती करणारी आई तिच्या चार वर्षीय बालकासह रस्ता ओलांडत होती. त्याचवेळी भरधाव वाहनाने तिला जोरदार धडक दिली. त्या धडकेत महिला गंभीर जखमी झाली. मुलगा किरकोळ जखमी झाला. अपघातानंतर परिसरातील काही नागरिकांनी जखमी महिलेला आणि बालकाला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले.कोमात गेलेल्या महिलेवर उपचार सुरू असताना सीपीआरमधील कर्मचाऱ्यांनी व अंनिसच्या कार्यकर्त्या गीता हसूरकर यांनी माणुसकी दाखवत बालकाचा सांभाळ केला, पण आईशिवाय जगात दुसरे काहीच नसलेले बालक अपघाताने सैरभैर झाले. अखेर त्याच्या आईची चार दिवसांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि तिने सोमवारी जगाचा निरोप घेतला. या अपघातामुळे निष्पाप बालक पोरके झाले. त्याला आता पोलिसांकडून बालगृहात पाठवले जाणार आहे

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू