शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बंदुकीचा धाक दाखवून महिलेचे लैंगिक शोषण, दोनवेळा केला गर्भपात; कोल्हापुरातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 15:50 IST

एएस ट्रेडर्सविरोधी कृती समितीचा प्रमुख विश्वजित जाधव याच्यावर गुन्हा दाखल

कोल्हापूर : लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एएस ट्रेडर्सविरोधी कृती समितीचा प्रमुख विश्वजित सचिन जाधव (रा. आयडियल कॉलनी, फुलेवाडी) याच्यावर शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बंदुकीचा धाक दाखवून त्याने २०१८ पासून लैंगिक शोषण केले. दोनवेळा गोळ्या देऊन गर्भपात केल्याचाही उल्लेख पीडितेने फिर्यादीत केला आहे.गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या एएस ट्रेडर्स कंपनीच्या विरोधात विश्वजित जाधव याने काही गुंतवणूकदारांना सोबत घेऊन विरोधी कृती समिती तयार केली होती. या समितीच्या माध्यमातून त्यांनी तपासाबाबत उच्च न्यायालयात पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्याच्या विरोधात एका तरुणीने शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पीडितेच्या फिर्यादीनुसार संशयित जाधव याने लग्नाचे आमिष दाखवून २०१८ पासून वारंवार शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. बंदुकीचा धाक दाखवून आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची भीती घालून लैंगिक शोषण केले. गर्भधारणा झाल्यानंतर दोनवेळा गोळ्या देऊन गर्भपात घडवून आणला. मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्रास असह्य झाल्याने अखेर तिने शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस